शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:48 IST

Sonam Raghuvanshi : मेघालय पोलिसांच्या एसआयटीने आज आरोपी सोनमला इतर आरोपींसह घटनास्थळी नेले.

Sonam Raghuvanshi :  राजा रघुवंशी याची हत्या त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिनेच केल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आज हत्येचा तपास मेघालय पोलिस करत आहेत. आज पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी आणले होते. हत्येच्या कटात पत्नी सोनम सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. आज पुन्हा २३ मे चा सीन पुन्हा तयार करण्यात आला आणि त्या दिवशी फक्त १८ मिनिटांत राजा रघुवंशीची हत्या कशी झाली हे उघड झाले. राजा रघुवंशीचे दोन्ही भाऊ मेघालय पोलिसांच्या तपासावर समाधानी दिसत आहेत.

Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....

राजा रघुवंशी याचा मोठा भाऊ विपिन आणि सचिन म्हणाले एएनआय या वृत्तसंस्थेला बोलताना म्हणाले की, जर ते सोनम रघुवंशीला भेटले तर ते तिला विचारतील की तू राजाला का मारलेस? सचिन रघुवंशीने सोनमला जन्मठेपेची मागणी केली आहे. विपिनने सोनम रघुवंशीचे एन्काउंटर करण्याचीही मागणी केली आहे.

पोलिस आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले  

आज मेघालय पोलिसांच्या एसआयटीने आरोपी सोनमला घटनास्थळी नेले, तिच्यासोबत इतर आरोपी होते. यावर राजा रघुवंशीचा भाऊ विपिन म्हणाला की, मेघालय पोलिस राजाला न्याय मिळवून देण्यासाठी चांगले काम करत आहेत. जर मी सोनमसमोर आलो तर मी तिला विचारेन की तिने राजाला का मारले. मेघालय पोलिस गुन्ह्याचा बारकाईने तपास करत  आहेत, त्यामुळे तपास चांगला चालला आहे. आम्ही या तपासावर खूश आहोत. यावेळी सोनमच्या एन्काउंटरची त्याने मागणी केली. 'हे लोक आता तुरुंगात जातील, नंतर त्यांना पॅरोलवर सोडले जाईल, एन्काउंटर करणे चांगले, त्यांना लगेच संपवा', अशी मागणी त्याने केली.

यावेळी सचिन रघुवंशी म्हणाले की, मी मनापासून म्हणतो की मेघालय पोलिस राजा हत्याकांडाचा तपास खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. आज सोनममुळे मेघालयची बदनामी झाली आहे, यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, तिला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. सोनमला मरेपर्यंत तुरुंगात ठेवले पाहिजे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस