शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या 'या' चित्रपटावरून सोनमला सुचला राजाच्या हत्येचा कट; भाऊ सचिन रघुवंशीचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:53 IST

सोनमने आपल्या प्रियकर राज कुशवाहा आणि तीन कॉन्ट्रॅक्ट किलर्स आकाश राजपूत, विशाल उर्फ विकी ठाकूर आणि आनंद कुर्मी यांच्या मदतीने मेघालयातील सोहरा येथे राजाची निर्घृण हत्या केली.

राजा रघुवंशी हत्येप्रकरणात आता आणखी एक धक्कादायक वळण समोर आले आहे. मृत राजा रघुवंशी याचा भाऊ सचिन रघुवंशी याने माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केला की, राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिने २००२चा बॉलिवूड चित्रपट ‘हमराज’च्या कथेवर आधारित कट रचून पतीची हत्या केली. या आरोपाने प्रकरण आणखी वेगळ्या वळणावर पोहोचले आहे.

चित्रपटातील कथानकासारखा कटसचिनच्या म्हणण्यानुसार, सोनमने आपल्या प्रियकर राज कुशवाहा आणि तीन कॉन्ट्रॅक्ट किलर्स आकाश राजपूत, विशाल उर्फ विकी ठाकूर आणि आनंद कुर्मी यांच्या मदतीने मेघालयातील सोहरा येथे राजाची निर्घृण हत्या केली. 

“सोनमने हमराझ चित्रपट पाहून, त्याच कथेप्रमाणे पतीच्या हत्येची योजना आखली. तिने राजाला सांगितले की, मंगळ दोषाचे निवारण करण्यासाठी त्यांना आधी मंदिरात जावे लागेल आणि त्यानंतर दोघांना त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करता येईल. मात्र, हा फक्त तिच्या कुटिल कटाचा एक भाग होता,” असे सचिनने स्पष्ट केले.

सात कुटुंबं उद्ध्वस्त केले!राजाच्या भावाने आपल्या भावना व्यक्त करताना सोनमला ‘पिशाचिनी’ असे संबोधले. “सोनममुळे सात कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, आमचे कुटुंब, तिचे स्वतःचे कुटुंब, चार मारेकऱ्यांची कुटुंबे आणि मेघालयात पर्यटनावर अवलंबून असलेली कुटुंबे यामुळे बेचिराख झाली. ती एक निर्दयी स्त्री आहे, जिने सर्वांचा विनाश केला,” असे त्याने म्हटले.

मेघालय सरकारची माफी व पोलिसांचे कौतुकसचिन रघुवंशी यांनी मेघालय सरकार आणि स्थानिक लोकांची जाहीर माफी मागितली. “सोनममुळे मेघालयाची प्रतिमा मलिन झाली. हे राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मी संपूर्ण भारताला सांगू इच्छितो की मेघालय हे एक सुंदर आणि सुरक्षित पर्यटनस्थळ आहे.”

सचिन रघुवंशी पुढे म्हणाले की, “२३०० किमी अंतरावरून तपास करत १७ दिवसांत हे प्रकरण उलगडणाऱ्या मेघालय पोलिसांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांची कार्यक्षमता वाखाणण्याजोगी आहे. आता सोनमवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करतो.”

‘ऑपरेशन हनिमून’चा यशस्वी तपास

मेघालय पोलिसांनी ‘ऑपरेशन हनिमून’च्या माध्यमातून २३ मे रोजी घडलेल्या हत्येचा तपशीलवार तपास करत आरोपींना पकडले. सोनमने राजाला निर्जन स्थळी नेऊन, आधीपासूनच तिथे दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांच्या हवाली केले. ९ जून रोजी सोनमने गाझीपूर येथे आत्मसमर्पण केले. पोलिसांच्या ताब्यात आलेल्या ४२ सीसीटीव्ही फुटेजसह अन्य ठोस पुराव्यांमुळे सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदार