शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:25 IST

Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सोनम रघुवंशी हिच्या मोबाईलमधील कॉल डिटेलमधून ती हे हत्याकांड घडण्यापूर्वी काही महिने आधी संजय वर्मा नावाच्या एका तरुणाच्या सातत्याने संपर्कात होती, अशी माहिती उघड झाली आहे.

सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या इंदूर येथील राजा रघुवंशी हत्या प्रकरणाच्या तपासामधून दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सोनम रघुवंशी हिच्या मोबाईलमधील कॉल डिटेलमधून ती हे हत्याकांड घडण्यापूर्वी काही महिने आधी संजय वर्मा नावाच्या एका तरुणाच्या सातत्याने संपर्कात होती, अशी माहिती उघड झाली आहे. सोनम रघुवंशी हिने संजय वर्मा नावाच्या तरुणाला १ मार्च ते २५ मार्च या २५ दिवसांच्या कालावधीमध्ये तब्बल ११२ वेळा फोन केला होता. त्यामुळे आता राजा सूर्यवंशी याच्या हत्येच्या प्रकरणात केवळ राज कुशवाहा नाही तर इतर काही लोकही सहभागी असण्याची शक्यता बळावली आहे. आता हा संजय वर्मा नेमका कोण याचा तपासा पोलीस करत आहेत.

राजा रघुवंशी हत्या प्रकरणामध्ये त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिच्या सुरू असलेल्या चौकशीदरम्यान संजय वर्मा याचं नाव समोर आलं आहे. तसेच या दोघांचंही मार्च महिन्यात वारंवार बोलणं झाल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मेघालय पोलिसांकडून संजय वर्मा हा सोनम रघुवंशी हिला मदत करणारा मुख्य मदतगार होता का? सोनमला वाराणसी आणि पुढे गाझीपूरपर्यंत कुणी पोहोचवलं? सोनमसोबत वाराणसीपर्यंत आलेले दोन तरुण कोण होते? ते आता कुठे आहेत? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली सोनम रघुवंशी ही काही दिवस बेपत्ता होती. त्यानंतर ती अचानक उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे सापडली होती. तसेच सोनमने दिलेल्या माहितीनुसार तिने वाराणसीहून गाझीपूरपर्यंतच्या केलेल्या प्रवासात तिच्यासोबत दोघेजण होते. याबाबत गाझीपूरमधील सैदपूर येथील रहिवासी उजाला यादव यांनी केलेल्या दाव्यानुसार त्या गाझीपूरला जाणारी बस पकडण्यासाठी वाराणसी स्टेशनवर आल्या असताना सोनम तिथे आली होती. तसेच तिने गोखरपूरला जाणाऱ्या गाडीबाबत माहिती विचारली होती. तेव्हा तिच्यासोबत दोन तरुणही होते, असे उजाला यादव यांनी सांगितले होते.

इंदूर येथील रहिवासी असलेल्या राजा सूर्यवंशी याचा विवाह सोनम रघुवंशी हिच्यासोबत ११ मे रोजी झाला होता. त्यानंतर हे दाम्पत्य हनिमूनासाठी मेघालयमध्ये गेले होते. तिथून हे दोघेही रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास केल्यावर राजा सूर्यवंशी याचा मृतदेह एका दरीत सापडला होता. तर बेपत्ता असलेल्या सोनम हिला पोलिसांनी काही दिवसांनंतर अटक केली होती.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस