शहरं
Join us  
Trending Stories
1
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
2
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
3
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
4
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
5
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
6
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
7
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
8
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
9
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
10
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
11
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
12
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
13
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
14
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
15
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
16
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
17
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
18
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
20
चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"माझा मुलगा बुडतोय, त्याला बाहेर काढा"; गुजरात पूल दुर्घटनेत अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आईचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 21:17 IST

गुजरातमध्ये पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Gujarat Bridge Collapse: गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात बुधवारी सकाळी पुलाचा एक भाग कोसळल्याने अनेक वाहने नदीत पडली. गुजरात पूल दुर्घटनेत अनेक लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले. त्यांच्यावर काय संकट ओढावलं असेल हे फक्त तेच समजू शकतात, आपण फक्त कल्पना करू शकतो. गुजरातमध्ये पुलाचा भाग कोसळून एका मुलासह १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ही महिला आक्रोश होती.

गुजरातमधील वडोदरा येथील महिसागर नदीवरील पूल बुधवारी सकाळी कोसळला. अपघात झाला तेव्हा पुलावरुन वाहने जात होती. पूल कोसळला तेव्हा दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा अशी पाच वाहने नदीत पडली. तुटलेल्या पुलाच्या टोकाला एक टँकर अडकला होता. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जणांना स्थानिक लोकांनी वाचवले. दोन जण बेपत्ता आहेत. ४५ वर्षे जुना हा पूल दक्षिण गुजरातला सौराष्ट्रशी जोडत होता. या भीषण घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये कंबरेभर पाण्यात उभी राहून गाडीत अडकलेल्या तिच्या मुलाला वाचवण्यासाठी ओरडून मदत मागत होती.

"माझा मुलगा बुडेल, कोणीतरी कृपया त्याला वाचवा," असं ती आई ओरडत होती. पाण्यात उभी राहून तिच्या मुलाला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होती. तिचा मुलगा गाडीत अडकला होता. त्या आईच्या ओरडण्या ऐकून लोकांच्याही डोळ्यात अश्रू आले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांच्या भावनिक प्रतिक्रिया येत आहेत.

बुधवारी सकाळी ७:३० च्या सुमारास, वडोदरा आणि आणंदला जोडणारा गंभीरा पूल अचानक कोसळला. अपघाताच्या वेळी पुलावर प्रचंड वाहतूक होती आणि दोन ट्रक, एक पिकअप व्हॅन, एक इको कार आणि एक ऑटो रिक्षा ही वाहने महिसागर नदीत पडली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, पूल कोसळताच मोठा आवाज आला आणि काही क्षणातच मोठ्याने आरडाओरडा सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, अपघातानंतर लगेचच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना वाचवले. "आम्ही सकाळपासून बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, त्यापैकी एक मूल आहे आणि एक मूल बेपत्ता आहे. या काळात आम्हाला प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. ४५ वर्षे जुन्या या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळा कळवण्यात आले आहे. प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज ही दुर्घटना घडली," असं मदतकार्य करणाऱ्या एका तरुणाने सांगितले. या अपघातासाठी प्रशासन पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक लोकांचा आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातAccidentअपघात