शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

DY Chandrachud: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. चंद्रचूड भूषवणार सर्वाेच्च पद; ५० वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 06:24 IST

न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे.

नवी दिल्ली : सरन्यायाधीश यू. यू. लळित यांनी उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस मंगळवारी केंद्राला केली. ती स्वीकारल्यानंतर न्या. चंद्रचूड ९ नोव्हेंबर रोजी ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेऊ शकतात.

न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांची १३ मे २०१६ रोजी पदोन्नतीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. ते देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काल भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. देशात पहिल्यांदाच या पदावर सरन्यायाधीश राहिलेल्या व्यक्तीच्या मुलाची निवड होत आहे. (वृत्तसंस्था)

अमेरिकेत एलएलएम, पीएच.डी.अर्थशास्त्रात बीए ऑनर्स पदवीनंतर न्या. चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून विधी पदवी मिळवली. अमेरिकेच्या हॉर्वर्ड लॉ स्कूलमधून एलएलएम पदवी व न्याय वैद्यक शास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केली. त्यांनी मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. मुंबई विद्यापीठात घटनात्मक कायदा विषयाचे अतिथी व्याख्याता म्हणून अध्यापन कार्य केले.

कर्नाटक मुख्य न्यायमूर्तीपदी न्या. प्रसन्न वराळेनागपूर : मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय विधि व न्याय मंत्रालयाने याची अधिसूचना जारी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने याविषयी गेल्या २८ सप्टेंबर रोजी शिफारस केली होती. न्या. वराळे औरंगाबाद जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. 

टॅग्स :Uday Lalitउदय लळीतSupreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड