शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

एकुलत्या एक मुलाने केली पोलीस शिपाई बापाची हत्या; गाडीची चावी न दिल्याने छातीवर केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 13:52 IST

उत्तर प्रदेशात दहावीत शिकणाऱ्या एका मुलाने क्षुल्लक कारणावरुन वडिलांची चाकूने वार करुन हत्या केली.

UP Crime : उत्तर प्रदेशातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये अल्पवयीन मुलाने शिक्षिका आईसमोर हेड कॉन्स्टेबल असलेल्या वडिलांची हत्या केली. कारण एवढेच होते की वडिलांनी गाडीची चावी देण्यास नकार दिला होता. रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने त्याच्या वडिलांच्या छातीवर चाकूने अनेक वार केले. हे वार इतके जोरदार होते की त्यामुळे वडिलांच्या हृदयाला जखमा झाल्या. जखमी वडिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेत तपास सुरु केला आहे. या सगळ्या घटनेमुळे कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने आपल्या हेड कॉन्स्टेबल वडिलांची चाकूने हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलाने वडिलांची हत्या केल्याची बातमी पसरल्याने परिसरात खळबळ उडाली. बुलंदशहर कोतवाली देहाट परिसरातील यमुनापुरम कॉलनीती हा सगळा प्रकार घडला. दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने कारची चावी न दिल्याने वडिलांचा चाकूने भोसकून खून केला.  जखमी प्रवीण कुमार यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र वाटेतच प्रवीण कुमार यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा मृत प्रवीण कुमार यांची पत्नी व सासरे घरी उपस्थित होते.

घटनेची माहिती देताना मृताचे सासरे विशंभर दयाळ यांनी सांगितले की, "हा सगळा प्रकार घडला तेव्हा ते घरीच होते. प्रवीणचा मुलगा बाहेर फिरून  येण्यासाठी गाडीच्या चाव्या मागत होता. मात्र प्रवीण नकार देत होता. दोन-तीन दिवसांपूर्वीच तो रात्रभर कार घेऊन कुठेतरी गेला होता. त्यामुळेच प्रवीण आपल्या मुलाला कार देण्यास नकार देत होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर प्रवीणच्या मुलाने रागाच्या भरात भाजी कापण्याचा चाकू आणून प्रवीणच्या छातीत वार केला. चाकू थेट प्रवीणच्या हृदयात घुसला. चाकूच्या जखमेमुळे रक्तस्त्राव सुरू झाला. यानंतर प्रवीण जमिनीवर कोसळला. प्रवीणला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला."

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हेड कॉन्स्टेबल प्रवीण कुमार पॉवर कॉर्पोरेशनमध्ये तैनात होते. ग्रामीण भागातील यमुना पुरम येथे ते कुटुंबासह राहत होते. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा नोंदवून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच खून केलेल्या मुलावर कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.

अल्पवयीन आरोपी हा शहरातल्या एका नामांकित शाळेत शिकत आहे. तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. आरोपी मुलाची आई ही एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. काही दिवसांपूर्वीच तिची बुलंदशहर येथे बदली झाली होती. "नातवाची संगत ठीक नव्हती. त्याचे आई वडील याआधीही त्याला बाहेर जाण्यापासून थांबवत होते. यावरुनच त्याचे पालकांशी भांडण होत होतं. पण तो एवढं मोठं पाऊल उचलेल असं कोणालाच वाटलं नव्हते," असे विशंभर दयाळ यांनी म्हटलं.

"दहावीच्या परीक्षा असल्याने प्रवीण कुमार यांनी त्यांची बदली बुलंदशहर येथे करुन घेतली होती. घटनेच्या एक दिवस आधीच मुलगा कार घेऊन बाहेर गेला होता.त्यानंतर सकाळी ४ वाजता घरी पोहोचला होता. अनेक नवस केल्यानंतर हा मुलगा जन्माला आला होता आणि त्याने वडिलांसोबत असं केलं," अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस