the son of a foreign mother can't be a patriot; bjp mp target rahul gandhi | परदेशी आईचा मुलगा राष्ट्रभक्त होऊ शकत नाही; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान

परदेशी आईचा मुलगा राष्ट्रभक्त होऊ शकत नाही; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान

नवी दिल्लीः राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' शब्दांवरून संसदेत मोठा गोंधळ निर्माण झाला. राहुल गांधी या विधानावरून माफी मागण्यास नकार दिल्यानं भाजपानं आता त्यांच्यावर विखारी टीका केली आहे. भाजपाचे चंपारण्यमधील भाजपा खासदार संजय जयस्वाल यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. परदेशी आईचा मुलगा हा कधीही राष्ट्रभक्त होऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर घणाघात केला आहे. चाणक्य यांनी केलेल्या विधानाचा हवाला देत त्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.

2000 वर्षांपूर्वी विष्णुगुप्त चाणक्य यांनी म्हटलं होतं की, परदेशी आईचा मुलगा हा कधीही राष्ट्रभक्त होऊ शकत नाही. लोकसभेत स्मृती इराणी आणि इतर भाजपा खासदारांनी राहुल गांधींच्या विधानाचा जोरदार विरोध केलेला आहे. याचदरम्यान भाजपा खासदार जयस्वाल यांनी उभं राहून राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ज्या पक्षाच्या अध्यक्ष स्वतः महिला आहेत, त्यांच्या मुलानं असं विधान करणं त्यापेक्षा दुर्दैवं ते काय?, असं जयस्वाल म्हणाले आहेत. तसेच राहुल गांधींच्या विधानानं मी दुःखी असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. असं विधान करणाऱ्या नेत्याला संसदेचा सदस्य राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचंही निर्मला सीतारामण म्हणाल्या आहेत.


संसदेच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधींनी रेप इन इंडियावरून माफी मागण्यास नकार दिला. दिल्ली रेप कॅपिटल झाल्याचं विधान पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्याची व्हिडीओ क्लिप माझ्याकडे आहे. ती व्हिडीओ क्लिप मी ट्विटरवर शेअर करेन, असं राहुल गांधी म्हणाले. यानंतर लगेचच त्यांनी मोदींच्या त्या विधानाची क्लिप ट्विटदेखील केली. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ईशान्य भारत पेटला आहे. त्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपानं रेप इन इंडियाच्या विधानावरुन वाद निर्माण केल्याचा दावा त्यांनी केला. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: the son of a foreign mother can't be a patriot; bjp mp target rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.