शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! अमूल कंपनीतील ड्रायव्हरचा मुलगा बनला दिग्गज डेअरी कंपनीत मोठा अधिकारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 21:09 IST

Inspirational story: अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना करत या तरुणाने मिळवले कौतुकास्पद यश...

नवी दिल्ली - आयआयएम अहमदाबादमधून हल्लीच झालेल्या प्लेसमेंटमधून २४ वर्षांच्या हितेश सिंह याची कंट्री डिलाइट कंपनीमध्ये असोसिएट मॅनेजर (नवीन उत्पादने) या पदासाठी निवड झाली आहे. हितेश सिंह याची डेअरी सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा होती. हे यश हितेश आणि त्याच्या वडिलांसाठी स्वप्नपूर्तीसारखे आहे. कारण हितेशचे वडील पंकज सिंह हे अमूल कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत. 

हितेश हा गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिडेटमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या आरएसएस सोढी यांनी आपले रोड मॉडेल मानतो. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याला पुढे जायचे आहे. हितेश याने गुजराती माध्यमातून शालेय शिक्षण घेतल्यानंतर १२वीमध्ये फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स या विषयांमध्ये ९७ टक्के गुण घेतले. शाळेच्या दिवसांपासून स्कॉलरशिपच्या मदतीवर शिक्षण घेणाऱ्या हितेशने कधीही क्लासची मदत घेतली नाही. डेअरी सायन्समधून बीटेकमध्ये डेअरी टेक्नॉलॉजी या विषयात अव्वल क्रमांक पटकावला होता. 

 हितेशचे वडील पंकज सिंह हे संपूर्ण कुटुंबासह बिहारमधून येऊन गुजरातमधील आणंद येथे येऊन स्थायिक झाले होते. त्यांनी सुरुवातीच्या दिवसांमध्ये सुरक्षारक्षकाचे काम हेले. ज्यामध्ये त्यांना दरमहा ६०० रुपये पगार मिळत होता. त्यानंतर २००७ मध्ये त्यांनी ड्रायव्हिंग शिकून नोकरी केली.  आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने हितेशने कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले. आयआयएम अहमदाबाद येथून त्याने फूट अँड अॅग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्याने पदव्युत्तर पदवी घेतली. त्यासाठी त्याला स्कॉलरशिप मिळाली होती. 

टॅग्स :jobनोकरीIndiaभारतFamilyपरिवार