शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Somnath Chatterjee Death Updates: आणीबाणीत रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी मिळवून दिला तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 13:36 IST

Somnath Chatterjee Death : सोमनाथ चॅटर्जींनी आयुष्यभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी काम केले असले तरी त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आणि ऋजू स्वभावाचा सर्वच पक्षातील नेते सन्मान करत.

मुंबई- लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे आज सकाळी कोलकात्यामध्ये निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी आयुष्यभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी काम केले असले तरी त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आणि ऋजू स्वभावाचा सर्वच पक्षातील नेते सन्मान करत. राजकीय विचारधारेनुसार ते भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे कट्टर विरोधक होते. मात्र त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे त्यांना नेहमीच सर्वांनी आदराचे स्थान दिले.

किपिंग द फेथ:मेमॉयर्स ऑफ अ पार्लमेंटरियन या त्यांच्या पुस्तकात त्यांनी लोकसभेतील आपल्या कार्यकाळातील अनेक अनुभव दिले आहेत. आणीबाणीच्या कालावधीमध्ये त्यांच्या पासपोर्टची मुदत संपली होती. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी मागणी केली परंतु त्यांना तो परत मिळालाच नाही. पासपोर्ट मिळविण्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते सिद्धार्थ शंकर रे यांच्याशी संपर्क करुन मदत मागितली. रे यांनी तत्कालीन गृहराज्यमंत्री ओम मेहता यांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी सांगितले. मात्र ओम मेहता आणि सिद्धार्थ शंकर रे यांची याबाबतीत मदत मिळाली नाही. 

अखेर आणीबाणी संपल्यावर नवे जनता सरकार केंद्रामध्ये सत्तेत आले. आतातरी आपल्याला पासपोर्ट मिळेल असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना पासपोर्ट देण्याची विनंती केली. वाजपेयी यांनी चॅटर्जी यांची समस्या जाणून घेतली आणि त्याच संध्याकाळी चॅटर्जी यांना पासपोर्ट मिळवून दिला. पासपोर्ट मिळाला म्हणजे स्वातंत्र्यच मिळाल्यासारखा आपल्याला आनंद झाला असे चॅटर्जी यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.

अर्थात असे असले तरी  सोमनाथ चॅटर्जी यांनी आपल्या राजकीय भूमिकेत कोणतीही तडजोड केली नाही. सर्वच पक्षांच्या सरकारच्या चुका दाखवून देण्यात आणि योग्यवेळी टीका करण्यात ते कधीही मागे राहिले नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली रालोआ सरकार सत्तेत आल्यावर अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हाही चॅटर्जी यांनी आपली विरोधी पक्षातील खासदाराची भूमिका व्यवस्थित पार पाडली.

 

टॅग्स :Somnath Chatterjeeसोमनाथ चॅटर्जीAtal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयीlok sabhaलोकसभाParliamentसंसदcongressकाँग्रेस