सोमनाथ भारती यांना अग्रिम जामीन नाहीच

By Admin | Updated: September 15, 2015 02:58 IST2015-09-15T02:58:23+5:302015-09-15T02:58:23+5:30

कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांना अग्रिम जामीन देण्यास सोमवारी दिल्लीच्या एका न्यायालयाने नकार दिला.

Somnath Bharti gets bail in advance | सोमनाथ भारती यांना अग्रिम जामीन नाहीच

सोमनाथ भारती यांना अग्रिम जामीन नाहीच

नवी दिल्ली : कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांना अग्रिम जामीन देण्यास सोमवारी दिल्लीच्या एका न्यायालयाने नकार दिला.
न्यायालयाकडून कुठलाही दिलासा न मिळाल्याने आता सोमनाथ यांची अटक अटळ मानली जात आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्या. संजय गर्ग यांनी भारती यांची अग्रिम जामिनाची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. लिपिका यांनी १० जून रोजी दिल्ली महिला आयोगासमक्ष तक्रार दाखल केली होती. २०१० मध्ये विवाह झाल्यापासूनच पतीकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी सोमनाथ भारती यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Web Title: Somnath Bharti gets bail in advance