कधी-कधी हिंसा आवश्यक असते, हिंदू आपल्या धर्माच्या रक्षणासाठी कटीबद्ध - भैयाजी जोशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:22 IST2025-01-23T18:21:58+5:302025-01-23T18:22:15+5:30
भैय्याजी जोशी म्हणाले, "हिंदू नेहमीच आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी, आपल्याला अशा गोष्टीही कराव्या लागतील ज्या इतरांना अधर्म वाटतील. आपल्या पूर्वजांनीही असे केले आहे...

कधी-कधी हिंसा आवश्यक असते, हिंदू आपल्या धर्माच्या रक्षणासाठी कटीबद्ध - भैयाजी जोशी
अहिंसेच्या विचाराचे रक्षण करण्यासाठी कधीकधी हिंसाही आवश्यक असते. याच बरोबर, भारतीय नागरिकांना शांततेच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी म्हटेल आहे. ते गुरुवारी गुजरात विद्यापीठाच्या मैदानात आयोजित हिंदू आध्यात्मिक सेवा मेळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
भैय्याजी जोशी म्हणाले, "हिंदू नेहमीच आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी, आपल्याला अशा गोष्टीही कराव्या लागतील ज्या इतरांना अधर्म वाटतील. आपल्या पूर्वजांनीही असे केले आहे.
महाभारताच्या युद्धाचा उल्लेख करत ते म्हणाले, पांडवांनीही धर्माचे रक्षण करण्यासाठी युद्धाच्या नियमांकडे उल्लंघन केले. हिंदू धर्मात अहिंसेचे तत्व उपजतच आहे, हे नाकारता येत नाही. मात्र, कधीकधी आपल्याला अहिंसेच्या विचाराचे रक्षण करण्यासाठी हिंसाचाराचाही अवलंब करावा लागतो. अन्यथा अहिंसेचा विचार कधीही सुरक्षित राहणार नाही. आपल्या महान पूर्वजांनी आपल्याला हा संदेश दिला आहे.
"भारतीय लोकांना शांततेच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल. जे सर्वांना सोबत घेऊन चालण्यात सक्षम आहेत, तेच शांतता प्रस्थापित करू शकता. जर एखादा धर्म दुसऱ्याला आपापल्या धर्माचे पालन करण्याची परवानगी देत नसेल तर, शांतता प्रस्थापित होणार नाही. भारताशिवाय असा कुठलाही देश नाही, जो सर्वांना सोबत घेऊन चालण्यास सक्षम आहे. 'वसुधैव कुटुंबकम' (विश्व एक कुटुंब आहे.) हा आमपाला विचार आहे. जर आपण संपूर्ण विश्वाला कुटुंब मानले, तर कुठलाही संघर्ष होणार नाही," असेही भैय्याजी जोशी यावेळी म्हणाले.