शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

काश्मीरच्या काही भागांत दुसऱ्या दिवशीही संचारबंदी, मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 4:51 AM

‘अल-कायदा’ शी संबंधित एका गटाचा स्वयंघोषित प्रमुख जाकिर मुसा सुरक्षादलांसोबतच्या चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरच्या काही भागांत लागू करण्यात आलेली संचारबंदी शनिवारी दुस-या दिवशीही कायम आहे.

श्रीनगर : ‘अल-कायदा’ शी संबंधित एका गटाचा स्वयंघोषित प्रमुख जाकिर मुसा सुरक्षादलांसोबतच्या चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरच्या काही भागांत लागू करण्यात आलेली संचारबंदी शनिवारी दुस-या दिवशीही कायम आहे. मुसा शुक्रवारी पुलवामात सुरक्षादलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. श्रीनगर, कुलगाम आणि पुलवामाच्या काही भागांत संचारबंदी अजूनही लागू आहे, असे पोलिसांनी सांगितले. शाळा आणि महाविद्यालये आणि काश्मीर खोºयात मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद आहे. बारामुल्ला-बनिहाल मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीर खोºयाच्या काही भागांत शनिवारी संचारबंदी लागू असेल. नौहाटा, रैनावाडी, खान्यार, सफाकदल आणि एमआर गुंग ठाण्याच्या क्षेत्रात कठोर प्रतिबंधक उपाय केले जात आहेत. दक्षिण कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात एका गावात सुरक्षादलांसोबत चकमकीत ‘अंसार गजावत-उल-ंिहंद’ चा जाकीर राशिद भट उर्फ जाकीर मुसा शुक्रवारी ठार झाला. मुसा पाकिस्तानच्या ंिनदानंतर कश्मीर खोºयात चर्चेत आला होता. त्याने बंदी असलेली अतिरेकी संघटना हिजबुल मुजाहिदीनशी असलेले संबंध तोडून अल-कायदाशी आपली निष्ठा व्यक्त केली होती. कॅरम खेळाडू मुसाने किशोरावस्थेत जम्मू आणि कश्मीरमधून वेगवेगळ््या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले होते.मुसा एप्रिल २०१३ पासून अतिरेकी कारवायांत सक्रिय होता. त्याने जेव्हा बुरहान वाणीशी हात मिळवून शस्त्र हाती घेतले तेव्हा तो अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. वाणी याला सुरक्षादलांनी २०१६ मध्ये चकमकीत ठार मारले होते. दक्षिण कश्मीरमधील स्थानिक लोकांत मुसा याची लोकप्रियता गेल्या तीन वर्षांत वाढली होती आणि वाणी मारला गेल्यानंतर मुसाला त्याचा उत्तराधिकारी मानले जात होते.मुसाने २०१६ मध्यें हुरियत नेत्यांना एका व्हिडिओतं धमकी देऊन अतिरेकी गट आणि फुटीरवाद्यांना धक्का दिला होता. त्याने म्हटले होते की, फुटीरवादी नेत्यांनी कश्मीर पाकिस्तानात विलीन करण्याच्या मागणीला पाठिंबा देणे बंद करावे.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर