शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दिशा रवीविरोधी एफआयआरसंबंधी काही वृत्त खळबळजनक- दिल्ली हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 07:42 IST

Disha Ravi : दिशा रवीने माझ्याविरुद्ध दाखल एफआयआरशी संबंधित माहिती प्रसार माध्यमांना फोडण्यापासून पोलिसांना मनाई करण्यासंबंधी याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली :  शेतकरी आंदोलनाशी संबंधित‘टूलकिट’ प्रकरणात पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीविरुद्ध दाखल एफआयआरसंबंधी काही माध्यमांतील वृत्त निश्चितच खळबळजनक आणि पूर्वग्रहित आहे, असे स्पष्ट करीत दिल्ली उच्च न्यायालयाने माध्यम प्रतिष्ठानांना चौकशीशी संबंधित फोडलेली सामग्री  प्रसारित न करण्याचा आदेश दिला.दिशा रवीने माझ्याविरुद्ध दाखल एफआयआरशी संबंधित माहिती प्रसार माध्यमांना फोडण्यापासून पोलिसांना मनाई करण्यासंबंधी याचिका दाखल केली आहे.  व्हॅाटस्‌ॲपसह  मी इतराशी केलेल्या अन्य  खाजगी गप्पागोष्टींचा सारांश प्रकाशित करण्यापासून माध्यमांना मनाई करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करताना  न्या. प्रतिभा एम. सिंह यांनी  पोलिसांना निर्देश दिले की,  चौकशी संबंधित कोणतीही माहिती माध्यमांना दिली नाही. तसेच असे करण्याचा इरादा नाही, अशी भूमिका  पोलिसांनी प्रतिज्ञापत्र  मांडली. त्याचे पोलिसांनी पालन करावे. टूलकिट प्रकरणात    अशा प्रकरणात माध्यमांना माहिती देण्यासाठी कायद्यानुसार पोलिसांना २०१० रोजीच्या निवदेनाचे पालन करून पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे. माध्यम प्रतिष्ठानांनी फक्त खात्रीशीर माहितीच प्रकाशित करावी.  तसेच दिशा रवीविरुद्ध एफआयआरप्रकरणी चाललेली चौकशी बाधित करू नये. खातरजमा करून आणि अधिकृत स्रोतांकडून प्राप्त वृत्त माध्यमांनी प्रकाशित वा प्रसारित करावे, असे निर्देश हायकोर्टाने दिले. याप्रकरणाशी संबंधित वृत्त सामग्री किंवा दिल्ली पोलिसांची ट्वीट हटविण्यासंबंधीच्या याचिकेवर नंतर विचार केला जाईल. खाजगीपणासह अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आणि देशाचे सार्वभौमत्व, ऐक्य यात समतोल असावा, असेही हायकोर्टाने सांगितले.

दिशाला ३ दिवस न्यायालीय कोठडीदरम्यान, पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्लीच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर दिशाला कोर्टात हजर केल्यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी तिची तुरुंगात रवानगी केली. सह-आरोपी शंतनू मुकूल आणि निकिता जेकब चौकशीत सामील झाल्यानंतर पोलिसांना दिशाची अधिक चौकशी करण्याची गरज लागू शकते. मुकूल आणि जेकब यांना २२ फेब्रुवारी रोजी पोलिसांसमक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, असे पोलिसांनी सुनावणीदरम्यान कोर्टाला सांगितले. बचाव पक्षाच्या वकिलाने पोलिसांच्या याचिकेला विरोध करत कोर्टाला दिशाची सुटका करण्याची विनंती केली.

टॅग्स :Disha Raviदिशा रविHigh Courtउच्च न्यायालय