एका रात्रीत लाकडी पूल उभारून जवानांनी ३५०० पर्यटकांना वाचवले, सिक्कीममधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 06:16 IST2023-06-18T06:01:01+5:302023-06-18T06:16:52+5:30
भारतीय सैन्य, त्रिशक्ती काेर आणि बीआरओच्या जवानांनी मुसळधार पाऊस आणि खराब वातावरणातही बचाव माेहीम राबविली.

एका रात्रीत लाकडी पूल उभारून जवानांनी ३५०० पर्यटकांना वाचवले, सिक्कीममधील घटना
गंगटाेक : ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे सिक्कीमच्या चुंगथांग येथे अडकलेल्या सुमारे ३ हजार ५०० पर्यटकांची भारतीय सैन्याने सुटका केली. या पर्यटकांमध्ये काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील रस्ता वाहून गेल्याने पर्यटक अडकले हाेते.
भारतीय सैन्य, त्रिशक्ती काेर आणि बीआरओच्या जवानांनी मुसळधार पाऊस आणि खराब वातावरणातही बचाव माेहीम राबविली. पावसामुळे चुंगथांग येथे अचानक पूर आला. त्यामुळे चुंगथांगला जाेडणारा रस्ता वाहून गेला. जवानांनी रात्रभर परिश्रम घेत तात्पुरता पूल उभारला आणि पर्यटकांना तेथून बाहेर
काढले. यावेळी पर्यटकांना जेवण तसेच वैद्यकीय मदत पुरविण्यात
आली. (वृत्तसंस्था)
मदतीसाठी तंबू, चौक्या
भारतीय लष्कर आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या जवानांनी पाऊस आणि प्रतिकूल हवामानात पर्यटकांना वाचवण्यासाठी रात्रभर जागून तात्पुरती क्रॉसिंग तयार केली. तंबू उभारून असून वैद्यकीय मदतीसाठी चौक्या बनविल्या.