जम्मू काश्मीर : स्वतःवर गोळी झाडून जवानाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 17:52 IST2019-02-13T17:06:08+5:302019-02-13T17:52:37+5:30
जम्मू काश्मीरमध्ये एका जवानाने स्वतःवर रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जम्मू काश्मीर : स्वतःवर गोळी झाडून जवानाची आत्महत्या
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये एका जवानाने स्वतःवर रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप सिंह असे आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे. पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मूळचे पंजाबमधील रहिवासी असलेले संदीप सिंह पनामा चौकातील एका ट्रान्झिट कॅम्प परिसरातील चौकीवर तैनात होते. ऑन ड्युटी असतानाच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांच्या साथीदारांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळेस संदीप सिंह मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान, कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यात आल्यानंतर संदीप यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पण, संदीप सिंह यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.