शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
5
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
6
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
7
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
8
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
9
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
10
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
11
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
12
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
13
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
14
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
15
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
16
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
17
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
18
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
19
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
20
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती

'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 11:35 IST

काका चंद्रदीप राय यांच्या निधनानंतर, राजू १७ मे रोजी सुटी घेऊन गावी परतले होते. श्राद्ध पार पडत असतानाच त्यांना अचानक छातीत वेदना होऊ लागल्या.

जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात असलेले आणि अलीकडेच पाकिस्तानविरोधात पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेले बीएसएफ जवान राजू कुमार (वय २९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. ही घटना वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहदुल्लापूर चक फरीद मधुरापूर गावात घडली.

काकांच्या श्राद्धासाठी आलेल्या जवानाला काळाने हेरलंराजू कुमार यांचे काका चंद्रदीप राय यांच्या निधनानंतर, राजू १७ मे रोजी सुटी घेऊन गावी परतले होते. श्राद्ध पार पडत असतानाच त्यांना अचानक छातीत वेदना होऊ लागल्या. कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कायदेशीर कारवाईनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

एकुलता एक मुलगा देशसेवेसाठी पाठवला!गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू कुमार २०२२ पासून जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होते. त्यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. राजू कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. राजू लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांच्या वडिलांचे नाव ब्रजनंदन राय (५५) असून, भावानंतर आता मुलगाही गमावल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

पत्नी आणि दोन मुलांचा आधार हरपलाराजू कुमार यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. जवानाच्या अकस्मात निधनामुळे संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आहे. सैनिकाच्या शेवटच्या दर्शनासाठी गावात हजारोंची गर्दी झाली होती.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरBSFसीमा सुरक्षा दलDeathमृत्यूJammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला