चार सहकाऱ्यांना गोळी मारून जवानाची आत्महत्या; बीएसएफ मुख्यालयातील घटना; एक जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:43 IST2022-03-07T06:43:42+5:302022-03-07T06:43:55+5:30
हल्लेखोर जवानाचे नाव सत्यप्पा आहे. सीमा सुरक्षा दलाने निवेदन प्रसिद्धीस दिले नसले तरी सत्यप्पा हा ड्यूटीच्या तासांवरून नाराज होता, असे सूत्रांनी म्हटले.

चार सहकाऱ्यांना गोळी मारून जवानाची आत्महत्या; बीएसएफ मुख्यालयातील घटना; एक जण गंभीर
- बलवंत तक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदीगड : पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) खासा येथील मुख्यालयात जवानाने रविवारी (दि. ६) सकाळी केलेल्या बेछूट गोळीबारात चार जवान ठार, तर एक जवान जखमी झाला. नंतर त्याने आत्महत्या केली.
हल्लेखोर जवानाचे नाव सत्यप्पा आहे. सीमा सुरक्षा दलाने निवेदन प्रसिद्धीस दिले नसले तरी सत्यप्पा हा ड्यूटीच्या तासांवरून नाराज होता, असे सूत्रांनी म्हटले. बीएसएफ मुख्यालय खानावळीत बीएसएफची बटालियन १४४चे जवान सकाळचा नास्ता करीत होते. सकाळी १०.३०च्या सुमारास सत्यप्पा रागात तेथे आला व त्याने अचानक गोळीबार सुरू केला. सत्यप्पा सतत गोळीबार करून खानावळीतून बाहेर पळाला. परंतु, पकडले जाऊ या भीतीतून त्याने गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्याचा मृत्यू झाला होता. जखमी जवान राहुल याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.