समाजाने वृद्धाश्रमांची संकल्पना स्वीकारावी ... जोड
By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:15+5:302015-08-18T21:37:15+5:30
त्याच वेळी थेट स्मशानघाट गाठले व चितेची राख डोक्यावर लावत समाजसेवेचे व्रत स्वीकारले. तेव्हापासून समाजसेवेचे व्रत स्वीकारलेले कालरा गरीब, लाचार, मतिमंद, अपंग, एचआयव्हीबाधित रुग्ण, वाईट अवस्थेत असलेले रोगी, कोणताही आधार नसलेले वृद्ध व बेघरांसाठी आधार झाले. दि अर्थ सेव्हियरच्या माध्यमातून गुरुकुल, वृद्धाश्रम, बालसुधारगृह, नारी निकेतन सुरू करण्यात आले. देशातूनच नाही तर विदेशातूनही अशी माणसे आपल्या गुरुकुलमध्ये येत असल्याचे कालरा म्हणाले.

समाजाने वृद्धाश्रमांची संकल्पना स्वीकारावी ... जोड
त याच वेळी थेट स्मशानघाट गाठले व चितेची राख डोक्यावर लावत समाजसेवेचे व्रत स्वीकारले. तेव्हापासून समाजसेवेचे व्रत स्वीकारलेले कालरा गरीब, लाचार, मतिमंद, अपंग, एचआयव्हीबाधित रुग्ण, वाईट अवस्थेत असलेले रोगी, कोणताही आधार नसलेले वृद्ध व बेघरांसाठी आधार झाले. दि अर्थ सेव्हियरच्या माध्यमातून गुरुकुल, वृद्धाश्रम, बालसुधारगृह, नारी निकेतन सुरू करण्यात आले. देशातूनच नाही तर विदेशातूनही अशी माणसे आपल्या गुरुकुलमध्ये येत असल्याचे कालरा म्हणाले.- ४,९८० बेवारसांचा अंत्यसंस्कारकालरा यांच्या संस्थेत २४ तास गरजवंतांना प्रवेश दिला जातो. सद्यस्थितीत ३५० लोक आश्रमात आहेत, त्यापैकी जवळपास १५० रुग्ण बेडवर खितपत असून त्यांची बेडवरच सेवाशुश्रुषा केली जाते. अशी सेवा करताना आतापर्यंत १००० लोकांनी आपल्या मांडीवर प्राण सोडल्याचे कालरा यांनी सांगितले. ज्यांचे कुणी नाही अशा ४,९८० बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार त्यांनी केेले. त्यांच्या अस्थी स्वत:च्या डोक्यावर हरिद्वार आणि इतर ठिकाणी विसर्जित केल्या. मानवाची सेवा हीच ईश्वरभक्ती असल्याचे सांगत मोक्षाचा मार्ग मिळाल्याचे रवी कालरा म्हणाले. - पर्यावरण रक्षण अभियानकालरा यांनी दिल्लीत ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात मोहीम राबविली. त्यांच्या प्रयत्नाने वाहनांच्या मागचे हॉर्न प्लीज मिटवून लाखांच्या वर वाहनांच्या मागे डू नॉट हॉर्न असे लिहिण्यात आले. कालरा वायू प्रदूषणाच्या विरोधातही मोहीम राबवीत आहेत. अंत्यसंस्कारासाठी विद्युत शवदाहिनीचा वापर करून वृक्षांची कत्तल टाळावी, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.