...म्हणून ‘वंदे मातरम्’मध्ये बदल व्हावा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:54 IST2017-09-27T16:53:15+5:302017-09-27T16:54:32+5:30

अनेक कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'वंदे मातरम्' गायलं जातं. यावरुन कायम वादही होत असतात.

... so that 'Vande Mataram' should be changed, Lok Sabha speaker Sumitra Mahajan said | ...म्हणून ‘वंदे मातरम्’मध्ये बदल व्हावा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचं वक्तव्य

...म्हणून ‘वंदे मातरम्’मध्ये बदल व्हावा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचं वक्तव्य

नवी दिल्ली : अनेक कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'वंदे मातरम्' गायलं जातं. यावरुन कायम वादही होत असतात. दैनिक जागरणनं दिलेल्या वृत्तानुसार, चार दिवसांपूर्वी इंदूरच्या गांधी हॉलमध्ये आयोजित संसदीय कार्य मंत्रालयाच्या चित्रकला प्रदर्शनात गायिकाने संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायलं. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं ‘वंदे मातरम्’मधील काही शब्द बदलण्यावर जोर दिला.

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यामते, ज्यावेळी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायलं जातं तेव्हा त्यात त्रुटी असतात. आता आपण सप्त कोटिच्या (सात कोटी) पुढे गेलोय. आता कोटी-कोटी झाले आहेत, त्यामुळे गातानाही कोटी-कोटी शब्द बोलायला हवा. ज्या भारत मातेसाठी गात आहोत, तिचं आजची रुपरेखाही पाहण्याची गरज आहे. त्यामुळे सप्त कोटि शब्द समकालीन राहिलेला नाही. 

महाजन यांच्या म्हणण्याचा अर्थ भारताच्या लोकसंख्येबाबत होता. हे गीत लिहिलं त्यावेळी, भारताची लोकसंख्या केवळ सात कोटी होती. यानंतर गायिकेने सुमित्रा महाजन यांची माफी मागत भविष्यात ही गोष्ट लक्षात ठेवेन, असं आश्वासन दिलं.  

तर संस्कृत साहित्यकार डॉ. मुरलीधर चांदनीवाला यांनी म्हटलं आहे की 1882 मध्ये प्रकाशित झालेल्या बंकिमचंद्र यांच्या प्रसिद्ध आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम् रचना केली होती. गीत लिहिलं तेव्हा देशाची लोकसंख्या सात कोटी होती, यामुळे सप्तकोटि कंठ कल-कल निनाद कराले, (सात कोटी कंठांचा जोशपूर्ण आवाज) द्विसप्त कोटि-भुजै धृत खरकरवाले (14 कोटी भुजांमध्ये तलवारी धारण केलेले) या ओळींमध्ये तेव्हाच्या लोकसंख्येचा उल्लेख केला होता.

Web Title: ... so that 'Vande Mataram' should be changed, Lok Sabha speaker Sumitra Mahajan said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.