शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून मेहबुबा सरकारचा पाठिंबा काढण्यासाठी भाजपाने निवडली ही वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 11:44 IST

धक्कातंत्राचा वापर करत भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जम्मू काश्मीरमधील मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता भाजपाने अचानक घेतलेल्या या निर्णयासाठी निवडलेल्या वेळेची चर्चा होत आहे.

नवी दिल्ली - धक्कातंत्राचा वापर करत भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जम्मू काश्मीरमधील मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता भाजपाने अचानक घेतलेल्या या निर्णयासाठी निवडलेल्या वेळेची चर्चा होत आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभेची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीच्या आधी होणार नाही हे निश्चित करून भाजपाने मेहबुबा सरकारचा पाठिंबा काढल्याचे बोलले जात आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राज्यपाल शासन लागू करण्याची तरतूद आहे. त्यामुळे पुढचे सहा महिने राज्यपाल शासनामध्येच निघून जावेत अशी भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाची इच्छा आहे. कारण हे सहा महिने राज्यपाल राजवटीत निघून गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजेल. अशा परिस्थितीत लोकसभेबरोबरच जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणुकही होईल, असा भाजपा नेत्यांचा होरा आहे. सद्यस्थितीत पुढील वर्षाच्या पूर्वार्धाच लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.  दरम्यान, आज सकाळपासून जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे. भाजपानं पीडीपीची साथ सोडल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार काल कोसळलं. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सनंदेखील सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे राज्यपाल नरिंदर नाथ वोहरा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू करण्यात यावं, अशी शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. याला कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे.  काल भाजपानं जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यपाल वोहरा यांनी मुफ्ती, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी. ए. मीर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात यावी, अशी शिफारस वोहरा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाPoliceपोलिस