त्यामुळे चंद्रावर उतरणं आहे कठीण, चंद्रयान-३ समोर काय काय आव्हानं? ISROचे माजी अध्यक्ष म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 22:20 IST2023-08-21T22:20:03+5:302023-08-21T22:20:03+5:30
Chandrayaan-3: चंद्राच्या दिशेने झेपावलेलं यंद्रयान-३ सध्या चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. चंद्रयान-३ मोहिमेतील लँडर मॉड्युल बुधवारी चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

त्यामुळे चंद्रावर उतरणं आहे कठीण, चंद्रयान-३ समोर काय काय आव्हानं? ISROचे माजी अध्यक्ष म्हणाले...
चंद्राच्या दिशेने झेपावलेलं यंद्रयान-३ सध्या चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. चंद्रयान-३ मोहिमेतील लँडर मॉड्युल बुधवारी चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. नायर यांनी ही मोहीम नियोजित उद्देशानुसार यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याबरोबरच चंद्राच्या पृष्टभागावर टचडाऊन करणं ही एक जटिल प्रक्रिया असल्याचे आणि मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व प्रणाली एकत्र काम करणं आवश्यक असल्याने त्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
नायर यांनी पीटीआयशी संवाद साधताना सांगितले की, चंद्रावरील यशस्वी लँडिंग ग्रहांच्या अभ्यासाच्या पुढच्या टप्प्यासाठी इस्रोसाठी एक मोठी सुरुवात असेल. मात्र चंद्रावर उतरणं ही एक जटील प्रक्रिया आहे. आम्ही चंद्रयान-२ मोहिमेवेळी शेवटच्या दोन किमी अंतरामध्ये चुकलो होतो.
नायर यांनी पुढे सांगितले की, अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांना एकत्र काम करावं लागेल. थ्रस्टर, सेंसर, अल्टिमीटर, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि इतर सर्व गोष्टींचा त्यात अंतर्भाव होतो. कुठेही काही गडबड झाली तर आम्ही अडचणीत येऊ शकतो. आम्हाला वास्तवात सतर्क राहावं लागेल. तसेच लक्ष ठेवावं लागेल. यावेळी मोहीम यशस्वी व्हावी यासाठी इस्रोने पुरेशी खबरदारी घेतली आहे. मात्र तरीही आपल्याला प्रार्थना करावी लागेल.