शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

... त्यामुळे मी ट्रेन पुढे नेली, DMU रेल्वेच्या ड्रायव्हरचा लेखी जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 17:03 IST

मी संबंधित स्थानकावरुन ग्रीन आणि यलो सिग्नल मिळाल्यामुळे रेल्वे घेऊन मी निघालो होतो. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी रेल्वे येताच, मला तेथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसली

अमृतसर - अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची ह्रदयद्रावक घटना दसऱ्यादिवशी शुक्रवार (19 ऑक्टोबर) रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील डीएमयू गाडी 11091 रेल्वेच्या ड्रायव्हरने लेखी स्वरुपात आपलं उत्तर दिलं आहे. अरविंद कुमार असे या रेल्वेच्या ड्रायव्हरचे नाव असून या दुर्घटनेत माझी चूक नसल्याचे अरविंद कुमार यांनी म्हटले आहे. 

मी संबंधित स्थानकावरुन ग्रीन आणि यलो सिग्नल मिळाल्यामुळे रेल्वे घेऊन मी निघालो होतो. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी रेल्वे येताच, मला तेथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसली. ते पाहताच मी गाडीचा मोठा हॉर्न दिला आणि इमर्जंसी ब्रेकही लावला. मात्र, गाडीचा स्पीड लक्षात घेता गाडी जागेवर थांबली नाही. त्यामुळे अनेकजण गाडीखाली येऊन मोठी दुर्घटना घडली. मात्र, त्यानंतर तेथील लोकांनी रेल्वेवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. अशावेळी गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मी रेल्वे जागेवर न थांबवता पुढील स्टेशनवर नेली. तसेच, याबाबत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनाही माहिती दिली, असे या डीएमयु रेल्वेचे ड्रायव्हर अरविंद कुमार यांनी लेखी स्वरुपात दिली आहे. अमृतसर रेल्वे दुर्घटनेत 60 पेक्षा अधिक नागरिकांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. त्या प्रकरणात रेल्वेचा दोष नसल्याने, गाडीच्या ड्रायव्हरविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी स्पष्ट केले. त्यानंतर, आज रेल्वे ड्रायव्हरने आपला लेखी जबाब दिला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 61 झाली आहे. मृतांपैकी 9 जणांची ओळख पटणे शिल्लक आहे. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयलही अमेरिका दौरा सोडून परत आले.

दरम्यान, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी जखमींची विचारपूस केली व या दुर्घटनेची दंडाधिकारीय चौकशी जाहीर केली. रेल्वेही गँगमनने ड्रायव्हरला लाल बावटा का दाखवला नाही, याची चौकशी करणार आहे. मंत्री नवज्योत सिद्धू यांनीही रुग्णालय व अपघातस्थळी भेट दिली. सिद्धू यांच्या पत्नी कार्यक्रमास हजर होत्या. मात्र, त्या लवकर निघून गेल्या. त्यांनी सांगितले की, दहनाच्या वेळी रेल्वेमार्गावर उभे राहू नका, असे आयोजक वारंवार ध्वनिक्षेपकावरून सांगत होते. तसेच रेल्वेचा गेटमनही तेथे उपस्थित होता. त्याने लाल बावटा दाखवायला हवा होता. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा म्हणाले की, ही दुर्घटना होण्यात रेल्वेचा दोष नाही. त्यामुळे ड्रायव्हरवर कारवाई करण्यात येणार नाही. 

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटनाDeathमृत्यूAccidentअपघात