शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

...म्हणून एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव दिलं; सुप्रीम कोर्टात खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 08:33 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहे. ज्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं सांगितले आहे.

नवी दिल्ली - खरी शिवसेना कुणाची हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाली काढला असला तरी या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. सध्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. त्यातच निवडणूक आयोगाने कशाच्या आधारे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे यांना दिले याचा खुलासा केंद्रीय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात केला आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहे. ज्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं सांगितले आहे. निवडणूक आयोगाने म्हटलं की, कायद्यानुसार एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव वापरण्याची परवानगी दिली आहे. शिंदेंकडे निवडणूक चिन्ह जाणे योग्य होते. उद्धव ठाकरेंनी आमच्यावर लावलेले आरोप निराधार आहेत. संवैधानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आला. प्रशासकीय पातळीवर नाही. त्याचसोबत हे प्रकरण कोर्टासमोर आणू शकत नाही यावरही निवडणूक आयोगाने जोर दिला. 

कोणत्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला? निवडणूक आयोगाने त्यांच्या ७८ पानी निकालात म्हटलंय की, विधिमंडळापासून पक्षातील संघटनेपर्यंत बहुमत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याचे दिसले. आयोगासमोर दोन्ही गटाने आपापले दावे आणि कागदपत्रे सादर केली. एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर विजयी झालेल्या ५५ पैकी ४० आमदार होते. पक्षाच्या एकूण ४७ लाख ८२ हजार ४४० मतांपैकी ७६ टक्के म्हणजे ३६ लाख ५७ हजार ३२७ मतांची कागदपत्रे शिंदे गटाने आयोगासमोर सादर केली. त्याचमुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल दिला. 

सत्तासंघर्ष सुनावणीत राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हदरम्यान, सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर झालेल्या सुनावणीत राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. महाराष्ट्रातील सत्तांतरात राज्यपालांनी त्यांच्या अधिकाराचा योग्य वापर केला नाही? सरकार पाडण्यात राज्यपालांची भूमिका फायदेशीर ठरली. राज्यपालांनी त्यांच्या मर्यादेत राहावं. आमदारांच्या जीवाला धोका आहे म्हणून बहुमत चाचणी घेण्यास राज्यपाल सांगू शकतात का? बहुमत चाचणी बोलवण्याइतपत सरकारवर संकट आले होते का? ३ वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला असा प्रश्न राज्यपालांनी आमदारांना विचारायला हवा होता. पक्षात मतभेद असतील म्हणून बहुमत चाचणीचे आदेश देणे योग्य नाही असं सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी टिप्पणी केली. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय