शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

...तर देशाच्या सुरक्षेला धोका; मणिपूर प्रश्नावरून ‘इंडिया’ आघाडीतील  पक्षांच्या खासदारांनी व्यक्त केली चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 06:17 IST

"मदत शिबिरांमधील स्थिती दयनीय आहे. मुलांसाठी प्राधान्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे."

इम्फाळ : मणिपूरमधील जवळपास तीन महिन्यांपासून सुरू असलेला जातीय संघर्ष लवकर सुटला नाही तर त्यामुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे मत इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले आहे. विरोधी पक्षाच्या आघाडीचे २१ खासदार शनिवारपासून मणिपूरच्या दोन दिवस दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी राजभवन येथे राज्यपाल अनुसुया उइके यांची भेट घेतली. तसेच, इशान्येतील या राज्यातील परिस्थितीबाबत एक निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मदत शिबिरांमधील स्थिती दयनीय आहे. मुलांसाठी प्राधान्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर बैठकीनंतर राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यावर सहमती दर्शविली. त्यावर राज्यपाल उइके म्हणाल्या की, मैतेई आणि कुकी समुदायांमधील अविश्वास संपविण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांच्या शिष्टमंडळाने मणिपूरला भेट दिली पाहिजे. मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचा दावा त्यांनी केला. 

पीडितांची विचारपूस - दोन दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, शिष्टमंडळाने बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग आणि चुराचांदपूर येथील अनेक मदत छावण्यांना भेट दिली तसेच जातीय संघर्षाची झळ बसलेल्या लोकांच्या भेटी घेतल्या. - मणिपूरमध्ये ३ मे रोजी जातीय संघर्ष सुरू झाल्यापासून १६०हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले. - या शिष्टमंडळाने काही शिबिरांना भेट देऊन विचारपूस केली. राज्यपालांना निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळाचे सदस्य दुपारी दिल्लीला रवाना झाले.

या भागात अशी परिस्थिती आहे की, खोऱ्यातील मैतेई लोक कुकी राहत असलेल्या डोंगराळ प्रदेशात जाऊ शकत नाहीत आणि डोंगराळ प्रदेशातील लोक खोऱ्यात येऊ शकत नाहीत. धान्य, दूध, मुलांचे भोजन आणि अन्य आवश्यक वस्तूंची टंचाई आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम झाला आहे.     - अधीर रंजन चौधरी, काँग्रेस नेते

केंद्र सरकारला संसदेत चर्चा करण्याचे आवाहनचौधरी यांनी सांगितले की, खासदारांनी मणिपूरमध्ये जी परिस्थिती पाहिली त्याबद्दल ते संसदेत अहवाल सादर करतील आणि केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. मणिपूरमधील राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकांवर आम्ही संसदेत बोलू. आम्ही केंद्र सरकारला या विषयावर संसदेत चर्चा करण्याचे आवाहन करतो.

तीन महिन्यांपासून मणिपूर पेटलेलेचमणिपूर तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून अशांत आहे. मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये हा संघर्ष पेटला हाेता. यामुळे राज्यातून हजाराे लाेक स्थलांतर करीत आहेत. कुकी समुदायाने स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली आहे. दाेन महिलांची विवस्त्र धिंड काढल्यानंतर या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. संसदेतही यावरून प्रचंड गदराेळ झाला. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसBJPभाजपा