शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sandalwood Smuggling: छत्तीसगडमध्ये पांढऱ्या चंदनाची तस्करी, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त; 'पुष्पराज' फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 17:56 IST

छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात पांढऱ्या चंदनाची तस्करी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बिलासपूर: अभिनेता अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटात दाखविण्यात आलेल्या लाल चंदनाच्या तस्करीची सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. पण, आता छत्तीसगडमध्ये पांढर्‍या चंदनाच्या तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. बिलासपूर जिल्ह्यातील रतनपूर पोलीस स्टेशन परिसरात 5 लाख रुपये किमतीचे पांढरे सुगंधित चंदन जप्त करण्यात आले आहे. बसमधून हे पांढरे चंदन उत्तर प्रदेशात नेण्याचा प्रयत्न तस्कर करत होते.

या ठिकाणी होते पांढऱ्या चंदनाची लागवडबिलासपूर जिल्ह्याला लागून असलेल्या गौरेला पेंद्र मारवाही आणि कोरिया जिल्ह्याच्या जंगलात पांढरे चंदन उगवले जाते. आतापर्यंत या भागात पांढऱ्या चंदनाच्या तस्करीच्या घटना होत नव्हत्या. पण, बुधवारी सायंकाळी काही जण या प्रतिबंधित चंदनाची तस्करी करत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. 

या माहितीच्या आधारे रतनपूर पोलिसांनी परिसरात तपासणी सुरू केली. या तपासणीदरम्यान पोलिस पथक रतनपूर बसस्थानकावर आले असता सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास काही चंदनाने भरलेली पोती टाकून पळून गेले. पोलिसांनी तस्करांचा पाठलाग केला, पण अंधार आणि धुक्याचा फायदा घेत तस्कर पसार झाले.

या भागात आढळतात चंदनाची झाडे 

रतनपूर पोलिसांनी सांगितले की, तस्करांकडून 100 किलो पांढरे चंदन जप्त करण्यात आले आहे. याला वनविभागाने दुजोरा दिला आहे. या पांढऱ्या चंदनाची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे. गोरेला पेंद्र मारवाही, कोरिया, सुरगुजा सीमावर्ती जिल्ह्यांतील जंगलात पांढर्‍या चंदनाची झाडे आढळतात. परिसरात चंदनाची तस्करी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या तस्करांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

चंदनाचा उपयोग कुठे होतो ?

भारतात आणि भारताबाहेरही चंदनाच्या लाकडाला मोठी मागणी असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत पुष्पा चित्रपटात दाखवण्यात आलेल्या लाल चंदनाची तस्करी व्हायची. पण, आता ती बंद झाली आहे. तर, हे पांढरे चंदन लहान तुकड्यांमध्ये बाजारात विकले जाते. याशिवाय पांढर्‍या चंदनाचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये आणि पूजेच्या साहित्यात केला जातो. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिसSmugglingतस्करी