शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Smriti Irani Wayanad Visited: स्मृती इराणींचे सूचक वक्तव्य, वायनाडमधून निवडणूक लढवण्याच्या चर्चा सुरू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 10:33 IST

Smriti Irani Wayanad Visited: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी वायनाडच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यादरम्यान मीडियाशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Smriti Irani Wayanad Visited: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani ) यांनी मंगळवारी केरळमधील काँग्रेस खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाडला (Wayanad) भेट दिली. यावेळी इराणी यांनी अनेक मुद्दे उपस्थित करून जिल्ह्यात अद्याप फारसा विकास झाला नसल्याचा आरोप केला. स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठकीनंतर इराणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वायनाडमध्ये निवडणूक लढवण्याबाबत महत्वाची माहिती दिली.

वायनाडमधून निवडणूक लढवणार?पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचाही समाचार घेतला. मीडियाने विचारले की, पक्षाने तुम्हाला वायनाडचे तिकीट दिल्यावर तुम्ही येथून निवडणूक लढवणार का? त्यावर स्मृती इराणी म्हणाल्या, "मी राहुल गांधी नाही, मी अमेठीतून पळत नाही. मी अमेठीपासून वायनाडपर्यंत पूरक गोष्टी घेऊन येते. पक्षाने मला वायनाडची जबाबदारी दिली, तर मी विचार करेल, अशी माहिती इराणी यांनी दिली.

जिल्हयात कुठलाही विकास झाला नाहीसध्या देशातील आदिवासींचे जीवन सुखकर करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा मजबूत आणि विकसित करणे आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, पोषण आहार आणि आर्थिक सेवा यांसारख्या सेवा तिथल्या लोकांपर्यंत, विशेषतः गरीब लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कुठलाही विकास झाला नाही, असे त्या म्हणाल्या. 

त्या पुढे म्हणतात की, जिल्ह्यात सुमारे 1.35 लाख घरांमध्ये पाण्याची जोडणी नसणे, आदिवासींच्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष, त्यांच्या जमिनीच्या नोंदींचे डिझिटायझेशन न होणे आणि कौशल्य विकास सुनिश्चित करणे यासारख्या विविध त्रुटी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या. दरम्यान, स्मृती इराणींच्या या दौऱ्यानंतर त्या वायनाडमधून निवडणूक लढवू शकतील का, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक