शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सुनीता विश्वनाथसोबत काय चर्चा झाली? फोटो दाखवत स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 19:04 IST

स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.

Smriti Irani On Rahul Gandhi: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अमेरिका दौऱ्यावरुन मोठा आरोप केला आहे. "सुनीता विश्वनाथ राहुलसोबत अमेरिकेत बसल्या होत्या. जॉर्ज सोरोस हे भारताविरोधात काम करत असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे आणि सुनीता विश्वनाथ यांचेही सोरोस यांच्याशी संबंध आहेत," हा मुद्दा उपस्थित करत इराणी यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, "राहुल गांधी जॉर्ज सोरोस यांच्याशी काय बोलत होते, याची माहिती त्यांनी देशाला द्यायला हवी. सोरोस यांची भारतविरोधी विचारसरणी आपल्यापासून लपलेली नाही. अशा स्थितीत राहुल यांनी भारताबाहेरील भारतविरोधी लोकांना का भेटले, हे त्यांनी सांगावे?" 

जॉर्ज सोरोस आणि राहुल गांधींचे जुने नाते स्मृती यांनी दावा केला की, "जॉर्ज सोरोस आणि त्यांच्याकडून अर्थसहाय्य मिळवणाऱ्या संस्थाचा राहुल गांधींसोबत जुना संबंध आहे. ओपन सोसायटीचे जागतिक अध्यक्ष असलेले सलील सेठी नावाचे गृहस्थ जॉर्ज सोरोस यांच्या संस्थेचे सदस्य असल्याचे एका प्रकाशनात उघड झाले आहे. तेच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतदेखील होते."

फोटोद्वारे केला दावा त्या पुढे म्हणाल्या की, ''जॉर्ज सोरोस यांना भारतातील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार कसे हटवायचे होते, हा मुद्दा भाजपने यापूर्वीही उपस्थित केला आहे. राहुल यांचा अमेरिका दौरा भाजपने त्यांच्यावर दाखल केलेल्या एफआयआरशी संबंधित असल्याची माहिती भाजपला मिळत आहे.' 

कोण आहे सुनीता विश्वनाथ?यापूर्वी भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी ट्विट केले होते, "डीसीमध्ये 'थिंक टँक'शी संभाषण करताना राहुल गांधींच्या शेजारी उंच टेबलावर बसलेली महिला सुनीता विश्वनाथ आहे. सुनीता विश्वनाथ हिंदूज फॉर ह्युमन राइट्स (HFHR) च्या सह-संस्थापक आहेत आणि भारतीय अमेरिकन मुस्लिम कौन्सिल (IAMC) सारख्या कट्टरपंथी संघटनांसोबत काम करतात.''

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीAmericaअमेरिका