शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

नक्वींच्या राजीनाम्यानंतर मोदींकडून खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणींकडे मंत्रिपदे सोपविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 21:55 IST

आरसीपी सिंह हे भाजपात जाण्याची शक्यता आहे, तर नक्वींना भाजपामध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या सदस्यत्वाचा उद्या कार्यकाळ संपत असल्याने मुख्तार अब्बास नक्वी आणि आर सी पी सिंह यांनी आज राजीनामा दिला. यामुळे रिक्त झालेल्या त्यांच्याकडील मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार पंतप्रधान नरेंद्र मोदींनीज्योतिरादित्य शिंदे आणि स्मृती इराणी यांच्याकडे सोपविला आहे. 

स्मृती इराणी यांच्याकडे आता आधीच्या महिला व बाल विकास मंत्रालयाबरोबरच अल्पसंख्यांक मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे. याशिवाय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पोलाद मंत्रालय असणार आहे. 

आरसीपी सिंह हे भाजपात जाण्याची शक्यता आहे, तर नक्वींना भाजपामध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना निरोप देताना सांगितले की, या दोघांनी मंत्री असताना देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. या दोन्ही मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत आहे. मुख्तार अब्बास नकवी हे राज्यसभेचे सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ गुरुवारी संपत आहे. यावेळी भाजपाने नकवी यांना राज्यसभेवर पाठवले नाही. त्यामुळे पक्ष त्यांना मोठी जबाबदारी देऊ शकतो, असे मानले जात आहे. याशिवाय, उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत मुख्तार अब्बास नकवी हे भाजपाचे उमेदवार असू शकतात अशीही चर्चा आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात नकवी ८ वर्षांपासून कार्यरतमुख्तार अब्बास नकवी हे 2010 ते 2016 पर्यंत यूपीचे राज्यसभा सदस्य होते. 2016 मध्ये त्यांना झारखंडमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. नकवी यांनी 1998 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयात राज्यमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर, 26 मे 2014 पासून ते मोदी सरकारमध्ये अल्पसंख्याक कार्य आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री बनले. 12 जुलै 2016 रोजी नजमा हेपतुल्ला यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार मिळाला. त्यानंतर 30 मे 2019 रोजी मोदी मंत्रिमंडळात पुन्हा सामील झाले आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रीपद भूषवले.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेSmriti Iraniस्मृती इराणीNarendra Modiनरेंद्र मोदी