शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती इराणी संसदेत चांगल्याच भडकल्या; भाजपचा काँग्रेसवर जोरदार हल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 08:53 IST

वाद : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी राष्ट्रपती मुर्मु यांच्याबद्दल काढले अनुद्गार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याने राजकारण तापले असून, भाजपचे खासदार प्रचंड आक्रमक झाले आहेत. चौधरी यांनी केलेल्या अवमानकारक उल्लेखाबद्दल काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या खासदारांनी केली. 

गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज गुरुवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेत हा मुद्दा तापला. राष्ट्रपतींच्या अवमानामुळे संपूर्ण देशात आक्रोश आहे. काँग्रेस अध्यक्ष म्हणतात की, चौधरी यांनी माफी मागितली. पण चौधरी म्हणतात, मी का माफी मागू?, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. 

नेमके काय घडले? अधीर रंजन चौधरी यांनी २७ जुलै रोजी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रपतींचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला. त्यावरून गदारोळ माजला आहे. गुरुवारी संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर याच मुद्द्यावरून सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 

लोकसभेत काय घडले? लोकसभेचे कामकाज गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरू झाले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या, काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. हीच मागणी केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही केली. स्मृती इराणी यांच्या मागणीला भाजप खासदारांनी पाठिंबा दिला. चौधरी यांच्या वक्तव्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी १२ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर दिवसभर हाच गोंधळ सुरू होता. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

राष्ट्रपतींचा अवमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता. जे काही झाले ते केवळ अनावधानाने झाले आहे. मी बंगाली आहे. मला नीट हिंदी बोलता येत नाही. भाजप राईचा पर्वत करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची मी माफी मागेन, पण या ढोंगी लोकांसमोर माफी मागण्याचा संबंध नाही. काँग्रेस अध्यक्ष महिला असल्याने त्यांना भाजप लक्ष्य करीत आहे. त्यांना मी आव्हान देतो की, माझ्याशी लढावे. मला संसदेत स्पष्टीकरण देऊ द्यावे. - अधीर रंजन चौधरी, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते 

काँग्रेस आदिवासीविरोधी आहे. महिला आणि गरिबांच्याही विरोधी आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसने देशाच्या सर्वोच्च पदावर एका आदिवासी आणि गरीब परिवारातून निवडून आलेल्या महिलेचा अपमान केला आहे. या सर्व प्रकरणात सोनिया गांधी यांनी माफी मागावी. - स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीcongressकाँग्रेसBJPभाजपा