स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना हात जोडून विनंती
By हेमंत बावकर | Updated: October 28, 2020 18:53 IST2020-10-28T18:52:46+5:302020-10-28T18:53:08+5:30
Smriti Irani : कोरोनाचा विळखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळालाही बसला आहे. गेल्या महिन्यात गृह मंत्री अमित शहा यांनादेखील कोरोना झाला होता.

स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना हात जोडून विनंती
नवी दिल्ली : केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
याची घोषणा करताना मला शब्द सापडत नाहीत. परंतू मी सोप्या शब्दांत सांगते - मी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली कोरोना चाचणी लवकरात लवकर करून घ्यावी, ही हात जोडून विनंती करते, असे ट्विट इराणी यांनी केले आहे.
Union Minister Smriti Irani has tested positive for #COVID19pic.twitter.com/6aXnqogZ1t
— ANI (@ANI) October 28, 2020
कोरोनाचा विळखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळालाही बसला आहे. गेल्या महिन्यात गृह मंत्री अमित शहा यांनादेखील कोरोना झाला होता. तसेच अन्य मंत्र्यांनादेखील कोरोना झाला होता. गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे दिल्लीत निधन झाले होते. त्यांच्यावर दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याशिवाय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना रविवारी कोरोनाची लागण झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनाही कोरोनाची लागण झाली आहे.