स्मार्टफोनच्या विक्रीत २०० पटीने वाढ

By Admin | Updated: May 14, 2014 03:41 IST2014-05-13T19:10:56+5:302014-05-14T03:41:36+5:30

देशातील स्मार्टफोन विक्री यंदाच्या जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत २१० टक्क्यांनी वाढली.

Smartphone sales increase by 200 times | स्मार्टफोनच्या विक्रीत २०० पटीने वाढ

स्मार्टफोनच्या विक्रीत २०० पटीने वाढ

नवी दिल्ली : देशातील स्मार्टफोन विक्री यंदाच्या जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत २१० टक्क्यांनी वाढली. या वाढीमुळे या काळात देशात १.४५ स्मार्टफोनची विक्री नोंदली गेली. यापैकी अर्ध्याहून अधिक हँडसेट ३ जी सुविधा असणारे होते. सायबर मीडिया रिसर्च अर्थात सीएमआर या कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली.
सीएमआरने जारी केलेल्या निवेदनात भारताने वर्षभरापूर्वी याच कालावधीत ६६ लाख स्मार्टफोनची विक्री झाले होते. तथापि,स्मार्टफोनची विक्री ऑक्टोबर-डिसेंबर २०१३मध्ये १.९ टक्क्यांच्या किरकोळ वृद्धीसह १.४२ कोटी इतकी झाली. २०१४च्या पहिल्या तिमाहीत ५.८९ कोटी मोबाईल हँडसेटची विक्री झाली होती. २०१३च्या चौथ्या तिमाहीत ७.०४ कोटी मोबाईल हँडसेटची विक्री झाली होती.
देशी स्मार्टफोन बाजारात ४३.२ टक्के वाट्यासह सॅमसंग पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर देशी हँडसेट कंपनी मायक्रोसॉफ्टचा वाटा १७.५ टक्के आणि कार्बनचा वाटा ५.२ टक्के राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Smartphone sales increase by 200 times