मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. आलमपूरमधील एका सरकारी शाळेचे माजी मुख्याध्यापक सुरेश माहोर हे शिक्षण विभागात चालणाऱ्या धक्कादायक प्रकारावर नाराज आहेत. म्हणूनच ते भिंडचे जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गळ्यात चप्पलांचा हार घालून अनवाणी निघाले. शिक्षण विभागात पसरलेल्या भ्रष्टाचाराचा आणि प्रभावशाली लोकांच्या मनमानी कारभाराचा ते निषेध करत आहेत. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ते आपला निषेध सुरूच ठेवतील असं त्यांनी म्हटलं आहे.
शिक्षण विभागात अनेक कमतरता आहेत. याच कारणास्तव आलमपूर शाळेचे माजी मुख्याध्यापक सुरेश माहोर, गळ्यात चप्पल घालून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या भिंड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पायी निघाले आहेत. शिक्षण विभागात सुरू असलेल्या अनियमिततेवर कारवाई व्हावी अशी त्यांची इच्छा आहे.
कारवाईची मागणी
शिक्षक सुरेश माहोर कारवाईची मागणी करत आहेत. आलमपूरच्या सरकारी शाळांमध्ये अनियमितता आहे. सरकारी शाळांची परिस्थिती दयनीय आहे. शिक्षक वेळेवर येत नाहीत. शिक्षक वेळेवर शाळेत येत नाहीत. काही शिक्षक येतात पण सही केल्यानंतर लगेच निघून जातात असं सांगितलं.
गुटखा आणि दारूचं सेवन
सुरेश माहोर यांनी असंही सांगितलं की, शाळेतील काही शिक्षक गुटखा आणि दारूचं सेवन करतात. धूम्रपानही करतात. याचा विद्यार्थ्यांवर चुकीचा परिणाम होतो. मुलं चुकीच्या गोष्टी पाहूनही शिकतात.
यापूर्वीही केलं आहे उपोषण
सुरेश माहोर यांनी यापूर्वीही दोनदा उपोषण केलं होतं. त्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. पण त्यांना फक्त आश्वासनं मिळाली, कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणूनच यावेळी ते स्वतः निषेध करण्यासाठी बाहेर पडले आहेत. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत तो हार मानणार नाही. असं सुरेश यांनी म्हटलं आहे.