प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा, अद्यापही व्हेंटिलेटरवरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 07:14 IST2020-08-21T05:07:15+5:302020-08-21T07:14:49+5:30
त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील आर्मीज रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा, अद्यापही व्हेंटिलेटरवरच
नवी दिल्ली : मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्याने शस्त्रक्रिया झालेले तसेच कोरोनाच्या संसर्गाने ग्रस्त असलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (८४ वर्षे) यांच्या प्रकृतीत गुरुवारी किंचित सुधारणा झाली आहे. त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील आर्मीज रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या रुग्णालयाने प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीची माहिती देणारे एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. मुखर्जी यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय तज्ज्ञांचे एक पथक बारीक लक्ष ठेवून आहे. मुखर्जी यांना अद्यापही व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी व काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी १५ आॅगस्ट रोजी एका टीष्ट्वटमध्ये गेल्या वर्षी आपल्या वडिलांनी साजरा केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या आठवणींना उजाळा दिला होता. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधील आमच्या वंशपरंपरागत घरी माझे वडील व काका दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करायचे.