पायलट झोपला, सह पायलट टॅबवर आणि प्रवासी वा-यावर

By Admin | Updated: August 14, 2014 14:36 IST2014-08-14T09:52:13+5:302014-08-14T14:36:43+5:30

झोपाळू वैमानिक आणि टॅबवर व्यस्त असलेल्या सह वैमानिकाच्या निष्काळजीपणामुळे जेट एअरवेजच्या विमानातील प्रवाशांचा जीव टांगणीला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Sleeping pilot, on pilot tab and on passenger walk | पायलट झोपला, सह पायलट टॅबवर आणि प्रवासी वा-यावर

पायलट झोपला, सह पायलट टॅबवर आणि प्रवासी वा-यावर

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. १४ - जगभरात विमान अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भारतातील विमान कंपन्या यातून काही बोध घ्यायला तयार नाहीत. झोपाळू वैमानिक आणि टॅबवर व्यस्त असलेल्या सह वैमानिकामुळे जेट एअरवेजच्या मुंबईहून ब्रसेल्स येथे जाणा-या विमानातील प्रवाशांचा जीव टांगणीला लावला होता. दोन्ही वैमानिकांनी लक्ष न दिल्याने विमान थेट पाच हजार फूटांपर्यंत खाली आले मात्र यासंदर्भात वैमानिकांना वेळीच सतर्क करण्यात आल्याने पुढील अपघात टळला. या दोन्ही वैमानिकांविरोधात भारताच्या हवाई वाहतूक संचालनालयाने चौकशीला सुरुवात केली आहे. 
गेल्या शुक्रवारी जेट एअरवेजचे विमान मुंबईहून ब्रसेल्सच्या दिशेने निघाले होते. विमानातील मुख्य वैमानिक 'आराम' करत होते. मुख्य वैमानिक आराम करत असताना सह पायलटने विमानावर नियंत्रण ठेवणे अपेक्षीत असते. मात्र सह पायलट महिला टॅबवर व्यस्त होत्या.  तुर्कीस्तानमधील हवाईहद्दीतून जाताना हे विमान ३४ हजार फुटांवर जाणे अपेक्षीत होते. मात्र अचानक हे विमान पाच हजार फूट खाली आले. हा प्रकार स्थानिक हवाई वाहतूक यंत्रणांना लक्षात आला. संवेदनशील क्षेत्रातून जाताना युरोपमधील हवाई वाहतूक यंत्रणा अतिशय जागरुक असतात.विमानाच्या उड्डाणाची अपेक्षीत उंची किंवा मार्ग यात किरकोळ बदल झाल्यास यंत्रणा तातडीने सतर्क होतात. सुदैवाने या विमानाच्या वैमानिकांना तातडीने त्यांची चूक लक्षात आणून देण्यात आली आणि पुढील अपघात टळला.
विशेष बाब म्हणजे भारताच्या हवाई वाहतूक संचालनालयाच्या (डीजीसीए) अधिका-यांना या घटनेची माहितीच नव्हती. या घटनेनंतरही दोन्ही वैमानिक निर्धास्तपणे काम करत होते. एका अज्ञात व्यक्तीने याप्रकरणी डीजीसीएच्या एका अधिका-याला एसएमएस केल्याने हा प्रकार उघड झाला. डीजीसीएने केलेल्या प्राथमिक चौकशीत या दोन्ही वैमानिकांनी निष्काळजीपणा दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या दोघांविरोधात चौकशी सुरु आहे. 

Web Title: Sleeping pilot, on pilot tab and on passenger walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.