महापुरुषांची बदनामी; नाशकातही तणाव (पान १ साठी)

By Admin | Updated: June 2, 2014 08:55 IST2014-06-02T08:55:51+5:302014-06-02T08:55:51+5:30

सहा बसेसच्या काचा फ ोडल्या : अफ वांचे पीक; कार्यकर्ते ताब्यात; पोलीस बंदोबस्त

Slander of great men; Tension in Nashik (for page 1) | महापुरुषांची बदनामी; नाशकातही तणाव (पान १ साठी)

महापुरुषांची बदनामी; नाशकातही तणाव (पान १ साठी)

ा बसेसच्या काचा फ ोडल्या : अफ वांचे पीक; कार्यकर्ते ताब्यात; पोलीस बंदोबस्त
नाशिक : फे सबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर प्रसिद्ध झालेली महापुरुषांची तसेच देवीदेवतांची आक्षेपार्ह छायाचित्रे व बदनामीकारक मजकुराचे पडसाद नाशिक शहरातही उमटले़ या प्रकारामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटना तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या सहा बसेस व कारच्या काचा फ ोडल्या, तर रविवारी दुपारी मेनरोडवरील दोन दुकानेही फ ोडण्यात आली़ द्वारका व त्र्यंबक नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करणार्‍या छावा व संभाजी ब्रिगेडच्या सुमारे ३५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़
रविवारी दिवसभर संपूर्ण शहरात अफ वांचे पीक आले होते़ पोलिसांकडे अमूक ठिकाणी दगडफे क, तमूक ठिकाणी जमाव जमल्याच्या बातम्या येत असल्याने पोलीस यंत्रणेची चांगली दमछाक झाली़ जुन्या नाशकातील शिवाजी चौक - अमरधामरोडवर काही समाजकंटकांनी दगडफे क केल्याचीही घटना घडली़ या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता पसरली होती़ कॉलेजरोड, मेनरोड, शालिमार येथील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली़
फे सबुकवरील या आक्षेपार्ह मजकुरासंदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे, तर सरकारवाडा पोलीस ठाण्यात रास्ता रोको आंदोलन करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी छावा संघटनेचे पाच व इतर दोन अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ द्वारका परिसरातील हिंदू एकता आंदोलनचे रामसिंग बावरी, करणसिंग बावरी, छावा तसेच संभाजी ब्रिगेड आदिंसह विविध संघटनांच्या सुमारे ३५ ते ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
दरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांसह शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांच्यासह परिमंडळ-१ व २ मधील पोलीस निरीक्षक शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवून होते़

फ ोटो :- ०१ पीएचजेएन १५५ व १५६
शिवाजी चौक - अमरधामरोडवर अज्ञात समाजकंटकांनी केलेली दगडफे क़ या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दाखल झालेले पोलीस कर्मचारी़

Web Title: Slander of great men; Tension in Nashik (for page 1)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.