शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Air India चा प्रत्येक सहावा कर्मचारी कोरोनाबाधित, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 16:01 IST

Air India : नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिली माहिती, वंदे भारत मोहिमेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश

ठळक मुद्देवंदे भारत मोहिमेतील वंदे भारत मोहिमेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश१९९५ कर्मचाऱ्यांना १ फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची लागण

Air India मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एअर इंडियाचा प्रत्येक सहावा कर्मचारी हा कोरोना बाधित आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे एअर इंडियाच्या १९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत लेखी स्वरूपात याबाबत माहिती दिली. १ फेब्रुवारीपर्यंत एअर इंडियाच्या एकूण १९९५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये वंदे भारत या मोहिमेच्या सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कोरोनाबाधितांपैकी एकूण ५८३ जण हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. संसदेत लेखी स्वरूपात हरदीप सिंग पुरी यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांद्वारे देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार १ जानेवारीपर्यंत एअर इंडियाकडे १२,३५० कर्मचारी होते. त्यापैकी ८,२९० स्थायी कर्मचारी तर ४,०६० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी आणि एअर इंडियाच्या आरोग्य विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्याच मार्गदर्शक सूचनांद्वारे काम करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, मागील आठवड्यात पुरी यांनी ही माहिती दिली होतीभारतात, चौथ्यांदा फेब्रुवारीमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या १० हजारांपेक्षा कमी ९,१२१ इतकी होती. त्यानंतर देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढून १,०९,२५,७१० झाली आहे. या महिन्यात दहाव्यांदा कोरोनाच्या संक्रमणामुळे एका दिवसात १०० पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात विषाणूमुळे आणखी ८१ लोकांचा मृत्यू झाल्याने आता एकूण मृतांची संख्या वाढून १,५५,८१३ झाली आहे.आतापर्यंत देशात १,०६,३३,०२५ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तसंच आतापर्यंत रुग्ण बरे होण्याचा दरही ९७.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा १.४३ टक्के आहे. देशात सध्या दीड लाखांपेक्षाही कमी रुग्णावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाcorona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसदpilotवैमानिकairplaneविमान