सोळा वर्षांच्या मुलीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:14 IST2018-04-25T00:14:43+5:302018-04-25T00:14:43+5:30
ही मुलगी कारमध्ये बसताच तिच्या तोंडात रुमाल कोंबून बलात्कार करण्यात आला.

सोळा वर्षांच्या मुलीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार
ग्रेटर नॉयडा : येथे १८ एप्रिल रोजी सोळा वर्षाच्या ११ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर धावत्या कारमध्ये तिच्या एका नातेवाईकासह तिघा जणांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणातील सर्व आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. स्कूलबस चुकल्याने ही मुलगी घरी चालत घरी येत असताना ओळखीच्या तिघा जणांनी तिला कारने घरी सोडायची तयारी दाखवली. या तिघांमध्ये तिच्या वर्गातील मुलगा व आणखी एक युवक होता. ही मुलगी कारमध्ये बसताच तिच्या तोंडात रुमाल कोंबून बलात्कार करण्यात आला.
त्यानंतर तिला गुंगी आणणारे पेय बळजोरीने पाजण्यात आले. ती घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. येथील नॉलेज पार्कमधील एका इंजिनिअरिंग कॉलेजजवळील निर्जन रस्त्यावर पहाटेच्या सुमारात ती बेशुद्धावस्थेत आढळली. या बलात्कार प्रकरणी पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.