शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सनरूफमधून डोकं बाहेर काढलं अन् झटक्यात वेगळं झालं; देहारादून अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:16 IST

देहरादूनमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात सहा तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Dehradun Accident: देहरादून झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण उत्तराखंड हादरले आहे. एका चौकात भरधाव इनोव्हाने कंटेनरला धडक दिल्याने सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातावेळी दोन तरुणांची डोकी कारच्या सनरूफमधून बाहेर होती. गाडीची कंटेनरला धडकताच या दोन तरुणांची मान त्यांच्या शरीरापासून वेगळी झाली. या भीषण अपघातात सहा तरुणांचा जीव गेला. तीन दिवस उलटूनही या अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याचवेळी या अपघातातून बचावलेला एकमेव जखमी तरुणही रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. 

सोमवारी रात्री उशिरा बल्लुपूर चौक-गारिकांत रस्त्यावर ओएनजीसी चौकातून जाणाऱ्या कंटेनरला सुसाट वेगाने जाणाऱ्या इनोव्हा गाडीची धडक बसली. या अपघातात तीन तरुणी आणि तीन तरुण जागीच ठार झाले. अपघातात कारचे छत तुटल्याने तरुण आणि तरुणीचे डोके धडावेगळे झाले. तर उर्वरित चौघांचे मृतदेहही छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाले. 

मात्र, तीन दिवस उलटून गेले तरी या अपघाताबाबत कोणीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. बल्लूपूरहून गढी कॅन्टच्या दिशेने जात असताना सर्व मित्र एकत्र पार्टी करत होते आणि खूप आनंदी होते. भरधाव जाणाऱ्या कारची धडक एवढी भीषण होती की, गाडीचा चुराडा झाला आणि आत बसलेल्या तरुणांचे मृतदेहही छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत. 

या घटनेबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. इनोव्हाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. तरुण दारू पिऊन गाडी चालवत होते. बीएमडब्ल्यूसोबत स्पर्धा करत होते, असे विविध दावे केले जात आहेत. आता डेहराडूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी हे सर्व दावे खोटे असल्याचे म्हटलं आहे. 

"आम्ही शहरातील विविध भागातील कारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, त्यात कार अतिशय संथ गतीने जात आहे. म्हणजे ओव्हर स्पीडिंगच्या बाबतीत तथ्य नाही. फक्त, अपघाताच्या ठिकाणी गाडीचा वेग वाढला होता. अचानक वाहनाचा वेग वाढण्यासारखे काय झाले, हा तपासाचा विषय आहे. कारच्या ब्रेकखाली पाण्याची बाटली सापडली आहे. मात्र अपघातापूर्वी ती ब्रेकखाली आली की अपघातानंतर याचा तपास करण्यात येत आहे. बीएमडब्ल्यूसोबत स्पर्धा करण्याची माहिती देखील चुकीची आहे. बाकी सिद्धेश शुद्धीवर आल्यावर कळेल. अपघाताच्या वेळी तर सनरूफवर बसले नव्हते तर कारमध्ये बसले होते. शवविच्छेदनात मद्यपान करून गाडी चालवल्याचे आढळून आले नाही," अशी माहिती अजय सिंह यांनी दिली.

दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गुनीत (१९), नव्या गोयल (२३) आणि कामाक्षी (२०) यांचा समावेश आहे. या तिन्ही मुली देहरादून शहरातील वेगवेगळ्या भागात वास्तव्यास होत्या. याशिवाय कुणाल कुकरेजा (२३), अतुल अग्रवाल (२४) आणि ऋषभ जैन (२४) अशी मृत्यू झालेल्या तीन मुलांची नावे आहेत. त्यापैकी कुणाल हा हिमाचलमधील चंबा येथील रहिवासी होता, तर उर्वरित लोक देहरादूनचे रहिवासी होते. तर सातवा तरुण सिद्धेश अग्रवाल (२५) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघातPoliceपोलिस