मित्रांशी भांडण झाल्याने सहावीत शिकणा-या मुलीची आत्महत्या
By Admin | Updated: April 19, 2017 16:26 IST2017-04-19T16:26:32+5:302017-04-19T16:26:32+5:30
सहावीत शिकणा-या मुलीने आपल्या मित्रांशी झालेलं भांडण इतकं जिव्हारी लाऊन घेतलं की तिने आत्महत्या केली

मित्रांशी भांडण झाल्याने सहावीत शिकणा-या मुलीची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 19 - सहावीत शिकणा-या मुलीने आपल्या मित्रांशी झालेलं भांडण इतकं जिव्हारी लाऊन घेतलं की तिने आत्महत्या केली. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. जोधपूर पार्क शाळेत शिकणा-या या मुलीचं मधल्या सुट्टीत मित्रांशी भांडण झालं होतं. यानंतर तिने घरी आल्यानंतर आत्महत्येचं पाऊल उचललं.
10 वर्षीय श्रेष्ठाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येचं कारण लिहिलं आहे. चिठ्ठीत तिने आपल्या आई - वडिलांचा निरोप घेतला असून आपल्या मित्रांनी आपल्याला फसवलं असल्याचं लिहिलं आहे.
श्रेष्ठाच्या आईशी संवाद साधला असता लहान मुलांच्या भांडणात पालकांनी पडण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. त्यांना सांगितलं की, "मित्रांच्या पालकांकडून श्रेष्ठाला मुख्याधापकांकडे तक्रार करण्याची धमकी मिळत होती". श्रेष्ठाचे आई - वडिल काही मुलांच्या पालकांविरोधात तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.
कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं आहे की, "अशी कोणती परिस्थिती होती ज्यामुळे आमच्या मुलीने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं हे आम्हाला माहिती करुन घ्यायचं आहे. तिचे मित्र अजून लहान असून त्यांना एवढी समज नाही आहे".