शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सहा पोलिस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:39 IST

बेळगाव : कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिटन ३५०० रुपये दराच्या मागणीसाठी छेडलेल्या आंदोलनाला शुक्रवारी बेळगाव जिल्ह्यात हिंसक वळण लागले. ...

बेळगाव : कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिटन ३५०० रुपये दराच्या मागणीसाठी छेडलेल्या आंदोलनाला शुक्रवारी बेळगाव जिल्ह्यात हिंसक वळण लागले. हत्तरगी टोलनाका येथे निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांसह महामार्गावरील वाहनांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत सहा पोलिस जखमी झाले. सध्या परिसरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.ऊसदराच्या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील गुरलापूर येथे गेल्या नऊ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. हत्तरगी टोलनाका येथे सुरू असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी हत्तरगी टोल नाका येथे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून जोरदार निदर्शने करण्यास सुरुवात केली.महामार्ग रोखला जाण्याबरोबरच निदर्शनांची तीव्रता वाढू लागल्याने, तसेच पोलिसांनी वारंवार विनंती करूनही शेतकरी मागे हटण्यास तयार न झाल्यामुळे, अखेर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला. पोलिसांनी लाठीचार्ज सुरू करताच संयम सुटलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी तत्काळ पोलिसांवर आणि पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावरील दिसेल त्या खासगी व सार्वजनिक वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.या हिंसक घटनेमुळे बेळगाव-कोल्हापूर मार्गावरील बसवाहतुकीला मोठा फटका बसला. टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असले तरी, सध्या हत्तरगी टोल नाका परिसरात अत्यंत तणावग्रस्त वातावरण आहे.राष्ट्रीय महामार्गही रोखणार... : चुन्नप्पा पुजारीसरकारने त्वरित ऊसदराबाबत निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी बंदची हाक देण्यात येईल, तसेच राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी यांनी स्पष्ट केले. ‘सरकारने त्वरित ऊसदराबाबत निर्णय घ्यावा; अन्यथा राज्यव्यापी बंदची हाक देण्यात येईल; तसेच राष्ट्रीय महामार्गही रोखून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,’ असा निर्वाणीचा इशारा चुन्नप्पा पुजारी यांनी दिला.हत्तरगी टोलनाक्यावर दगडफेक; सहा पोलिस जखमी : डॉ. भीमाशंकर गुळेदयमकनमर्डी पोलिस स्थानकाच्या हद्दीतील हत्तरगी टोलनाक्याजवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीत सहा पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, काही पोलिस वाहनांचेही नुकसान झाले आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Karnataka Sugarcane Protest Turns Violent; Police Injured in Stone Pelting

Web Summary : Sugarcane farmers' protest in Belgaum turned violent, demanding ₹3500 per ton. Police used batons after highway blockade. Protesters retaliated with stone pelting, injuring six police officers. Tensions remain high; traffic disrupted.