झारखंडच्या मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांचा समावेश; दाेन महिलांना संधी, ११ आमदारांचा शपथविधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 08:13 IST2024-12-06T08:12:52+5:302024-12-06T08:13:07+5:30
झारखंड मुक्ती माेर्चाच्या कोट्यातून सहा, काँग्रेसच्या चार, राजदच्या एका आमदाराने कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

झारखंडच्या मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांचा समावेश; दाेन महिलांना संधी, ११ आमदारांचा शपथविधी
एस. पी. सिन्हा
रांची : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळाचा गुरुवारी विस्तार करण्यात आला. त्यानुसार ११ कॅबिनेट मंत्र्यांना त्यांच्या पदाची राज्यपाल संतोष गंगवार यांनी शपथ दिली. सहा नव्या चेहऱ्यांचा तसेच दोन महिलांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांचा शपथविधीही पार पडला.
झारखंड मुक्ती माेर्चाच्या कोट्यातून सहा, काँग्रेसच्या चार, राजदच्या एका आमदाराने कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
हफीजुल हसन अन्सारी यांनाही दिले मंत्रिपद
nराजभवनातील अशोक उद्यानात पार पडलेल्या समारंभात सर्वांत प्रथम राधाकृष्ण किशोर व सर्वांत शेवटी शिल्पी नेहा तिर्की यांनी शपथ घेतली.
nझारखंड मुक्ती मोर्चाचे मधुपूर येथील आ. हफीजुल हसन अन्सारी यांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे.
nकाँग्रेसच्या दीपिका पांडेय सिंह यांना पुन्हा संधी मिळाली. राधाकृष्ण किशोर, शिल्पी नेहा तिर्की, तर राजदचे संजय प्रसाद यादव हे पहिल्यांदा मंत्री बनले आहेत.