नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आहे. रमजान महिन्याच्या काळात पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत सीतारामन म्हणाल्या, "भारत शस्त्रसंधीच्या कराराचा आदर करतो. पण आगळीक करून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल. गृहमंत्रालयाने लष्कराशी चर्चा करून रमजानच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रत्युत्तरदाखल कारवाई करण्याचा अधिकार लष्कराला आहे. त्यामुळे लष्कराला डिवचल्यास ते नक्कीच प्रत्युत्तर देतील."
...तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 15:28 IST