शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ सत्तेत आल्यास निवडणूक रोखे प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 09:42 IST

लोकसभा निवडणुका होऊन गेल्यानंतर ही आकडेवारी जाहीर व्हावी, यासाठी बहुधा मोदी सरकारच्या इशाऱ्यानुसारच ‘एसबीआय’ने पावले उचलली असावीत, असा दावा जयराम रमेश यांनी केला.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास निवडणूक रोखे प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. ते म्हणाले की, निवडणूक रोखे हा ‘प्रीपेड लाच’ आणि ‘पोस्टपेड लाच’ असा मामला आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे.

निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे (एसबीआय) सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करण्यात आले. लोकसभा निवडणुका होऊन गेल्यानंतर ही आकडेवारी जाहीर व्हावी, यासाठी बहुधा मोदी सरकारच्या इशाऱ्यानुसारच ‘एसबीआय’ने पावले उचलली असावीत, असा दावा जयराम रमेश यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ‘एसबीआय’ला निवडणूक रोख्यांचा तपशील गेल्या २१ मार्च रोजी जााहीर करावाच लागला. निवडणूक रोखे हा मोठा घोटाळा आहे, असा आराेप रमेश यांनी केला.

काँग्रेस प्रस्थापित कंपनी, तर भाजप स्टार्ट-अप’काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस ही एका प्रस्थापित कंपनीसारखी असून भाजप हा स्टार्ट-अप आहे. प्रस्थापित कंपनीचे बाजार भांडवल कमी-जास्त होत राहते. तशीच काँग्रेसची स्थिती आहे; पण हा पक्ष पुन्हा नक्की सत्तेवर येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळेच भाजपला निवडणुकांत यश मिळत असल्याची गोष्ट जयराम रमेश यांनी अमान्य केली. संघटन सामर्थ्य हे अधिक महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसSBIएसबीआय