बहिणीला घेण्यासाठी जाणार्‍या भावाचा रेल्वेतून पडून मृत्यू

By Admin | Updated: November 15, 2015 23:14 IST2015-11-15T23:14:21+5:302015-11-15T23:14:21+5:30

जळगाव: दिवाळीसाठी बहिणीला घेण्यासाठी मुंबई येथे जात असताना रेल्वेतून पडून चंद्रकांत राजू शिरसाळे (वय २४,रा.बांभोरी ता.धरणगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारच्या मध्यरात्री घडली आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास मोहाडी ते नागझिरी दरम्यान रेल्वे लाईनवर गॅँगमन हितेंद्रला चंद्रकांतचा मृतदेह आढळून आला. त्याने स्टेशन प्रबंधक एन.टी.वर्मा यांना ही माहिती कळविली तसेच त्याच्या मोबाईलवरुन घरच्यांशी संपर्क साधला. दरम्यान, वर्मा त्यांनी याबाबची माहिती तालुका पोलिसांना कळविली. त्यानुसार कॉन्स्टेबल गिरीश पाटील व सहकार्‍यांनी घटनास्थळी जावून मृतदेहाची पाहणी केली व जिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Sister's brother dies in train | बहिणीला घेण्यासाठी जाणार्‍या भावाचा रेल्वेतून पडून मृत्यू

बहिणीला घेण्यासाठी जाणार्‍या भावाचा रेल्वेतून पडून मृत्यू

गाव: दिवाळीसाठी बहिणीला घेण्यासाठी मुंबई येथे जात असताना रेल्वेतून पडून चंद्रकांत राजू शिरसाळे (वय २४,रा.बांभोरी ता.धरणगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारच्या मध्यरात्री घडली आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास मोहाडी ते नागझिरी दरम्यान रेल्वे लाईनवर गॅँगमन हितेंद्रला चंद्रकांतचा मृतदेह आढळून आला. त्याने स्टेशन प्रबंधक एन.टी.वर्मा यांना ही माहिती कळविली तसेच त्याच्या मोबाईलवरुन घरच्यांशी संपर्क साधला. दरम्यान, वर्मा त्यांनी याबाबची माहिती तालुका पोलिसांना कळविली. त्यानुसार कॉन्स्टेबल गिरीश पाटील व सहकार्‍यांनी घटनास्थळी जावून मृतदेहाची पाहणी केली व जिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Sister's brother dies in train