रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:35 IST2025-08-07T15:33:13+5:302025-08-07T15:35:14+5:30

हरवलेली मुलगी आता तब्बल ६५ वर्षांनी तिच्या कुटुंबाला भेटली आहे.

sister separated from family 65 years ago ganga mela bijnor now celebrate rakshabandhan with brother rakhi | रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

रक्षाबंधनाआधी एका कुटुंबाला सुखद धक्का बसला आहे. १९६० मध्ये गंगास्नान मेळ्यात हरवलेली मुलगी आता तब्बल ६५ वर्षांनी तिच्या कुटुंबाला भेटली आहे. हा एखाद्या चित्रपटासारखा सीन होता. वयाच्या नऊव्या वर्षी बेपत्ता झालेली बिजनोरच्या कांभोर गावातील रहिवासी बालेश आता तिच्या भावंडांना आणि नातेवाईकांना भेटल्यानंतर खूप भावनिक झाली. ती रक्षाबंधनाच्या दिवशी तिचा भाऊ जगदीशला आता राखी बांधणार आहे. 

१९६० मध्ये कंभौरचे रहिवासी भगवाना सिंह त्यांची मुलगी बालेशसोबत गंगा स्नान मेळ्यात पोहोचले होते. पण एका घटनेने त्यांचं आयुष्यच बदललं. तिथे अचानक चेंगराचेंगरी झाली आणि जत्रेमध्ये मोठा गोंधळ झाला. याच दरम्यान ९ वर्षांची बालेश तिच्या कुटुंबापासून वेगळी झाली. तिला शोधण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले पण तिचा कोणताही पत्ता लागला नाही.

जत्रेमध्ये असलेल्या एका जोडप्याने तिला आपल्या घरी नेलं. दाल कुमारी आणि लाल सिंह या दाम्पत्याने तिला फर्रुखाबाद जिल्ह्यातील एका गावात मुलीसारखं वाढवलं. तिथे तिचं लग्न सिरौली गावातील अमन सिंहशी झालं, तिला मुलं आहेत.  या घटनेला अनेक वर्षे उलटून गेली, बालेश आता आजी झाली. एके दिवशी तिने नातू प्रशांतला तिच्या बालपणीचं सत्य सांगितले, ती एका मोठ्या जत्रेत कुटुंबापासून कशी वेगळी झाली. मग ती एका अज्ञात गावात कशी पोहोचली हे सांगितलं. हे ऐकून प्रशांतने गुगल मॅपच्या मदतीने बिजनौरमधील कंभौर गावी पोहोचला.

प्रशांत गावात पोहोचला आणि त्याने भगवाना सिंह आणि त्यांच्या मुलांबद्दल लोकांना विचारलं. प्रशांत बालेश यांचा भाऊ जगदीशला भेटला आणि आजीची गोष्ट सांगितली तेव्हा दोघेही फोनवर बोलले. संभाषणात जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि त्याला खात्री पटली की ही त्यांचीच बहीण आहे. यानंतर जगदीश सिंह त्यांच्या कुटुंबातील सदस्य सतेंद्र सिंह, नरेश सिंह, नरपाल सिंहसह सिरौलीला पोहोचले आणि बालेशला त्यांच्यासोबत गावात आणलं. बालेशला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नातेवाईकांनी गर्दी केली आहे.  

Web Title: sister separated from family 65 years ago ganga mela bijnor now celebrate rakshabandhan with brother rakhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.