सिंगल़़़़
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
चव्हाण यांना
सिंगल़़़़
चव्हाण यांना पुरस्कार प्रदान अहमदनगर : विरेंद्र युवक क्रीडा मंडळाच्यावतीने देण्यात येणारा क्रीडा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक कॅप्टन गजानन चव्हाण यांना शैलेश गवळी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला़ यावेळी प्रा़ विजय म्हस्के, ॲड़ संजय वालेकर, सुनील गोडळकर, प्रा़ अनंत काळे आदी उपस्थित होते़ पूर्व संचलन शिबिर अहमदनगर : न्यू लॉ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने सोमवारी प्रजासत्ताक दिन पूर्व संचलन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले़ यावेळी प्राचार्य डॉ़ अल्लुरी राजू, रामचंद्र दरे, डॉ़ संजयकुमार दळवी आदी उपस्थित होते़