सिंगल्स बातम्या

By Admin | Updated: May 8, 2014 20:53 IST2014-05-08T20:53:49+5:302014-05-08T20:53:49+5:30

ढोलकीवादक शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण

Singles news | सिंगल्स बातम्या

सिंगल्स बातम्या

लकीवादक शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण
नाशिक : ढोलकी वादनाने सांस्कृतिक क्षेत्रात लौकिक निर्माण करणारे ढोलकीवादक बाबुराव शिंदे यांचे अकाली निधन झाले. त्यांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आपल्या कतृर्त्वाने मोठा झालेला हा माणूस मनानेही तितकाच कलंदर होता, अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे नेते अण्णासाहेब कटारे होते. याप्रसंगी विजय पगारे, मधुकर जगताप, नारायण गायकवाड, संजय सानप आदि उपस्थित होते.
पांडवनगरी मार्गे बसची मागणी कायम
इंदिरानगर : पांडवनगरी मार्गे शरयूनगरसाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी अद्यापही कायम आहे. वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत असून, त्या तुलनेत बसची सुविधा नसल्याने नागरिकांनी बसची मागणी केली आहे. गेल्या बारा वर्षांपासून ही मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या भागातून बस नसल्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागते किंवा पाथर्डी रस्त्यावर जावे लागते. त्यामुळे या भागातून तातडीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी आहे.
शहरात सोनसाखळी, दुचाकी चोरीचे सत्र पुन्हा सुरू
नाशिक : शहरातील सोनसाखळी आणि दुचाकी चोरीचे सत्र बंद झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असतानाच शहरात पुन्हा दुचाकी चोरीचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता लग्नसराई असल्याने सोनसाखळी चोरीच्या घटना पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक दरम्यान, या दोन्ही प्रकारच्या गुन्हांवर नियंत्रण आले होते. आता निवडणूक संपल्याने पुन्हा एकदा अशा चोरीच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांनी संशयितांवर वेळीच नियंत्रण राखावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

Web Title: Singles news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.