सिंगलच्या बातम्या (२ बातम्या)
By Admin | Updated: September 6, 2015 23:09 IST2015-09-06T23:09:21+5:302015-09-06T23:09:21+5:30
मातोरी : पावसाअभावी परिसरातील टमाटा, वांगी, भुईमूग पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

सिंगलच्या बातम्या (२ बातम्या)
म तोरी : पावसाअभावी परिसरातील टमाटा, वांगी, भुईमूग पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.टमाटा, वांगी अशा पिकांना किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने वाढत्या उष्णतेमुळे अळीची वाढ जोमाने होत आहे, वारंवार कीटकनाशकांचा वापर करूनही कीड आटोक्यात येत नाही. परिसरात टमाटा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली आहे. यात प्रामुख्याने टमाट्यावर घुबडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकर्यांनी फ्लॉवरचा प्लॉट उपटून टाकण्यास सुरुवात केली आहे. पावसाच्या या लहरीपणाचा फटका मातोरी, मखमलाबाद, मंुगसरा परिसरातील शेतकर्यांना सहन करावा लागत आहे.अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याचा गुन्हाइंदिरानगर : चेतनानगर येथील नागरे मळा परिसरात राहणार्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. चेतनानगर येथील नागरे मळ्यात रवि राघुजी ढापसे आपल्या दोन मुली व पत्नीसह राहतात. बुधवार, दि. २ रोजी नेहमीप्रमाणे त्यांची मुलगी कामास गेली. दुपारी ३ वाजेपर्यंत घरी येणारी मुलगी आली नाही म्हणून त्यांनी ज्या ठिकाणी कामास जाते तेथे विचारपूस केली असता ती कामाला आलीच नाही, असे सांगण्यात आले. तातडीने परिसरात आणि नातेवाइकांकडे दोन दिवस शोध घेतला. परंतु ती कोठेही आढळून आली नाही. इंदिरानगर पोलीस ठाण्यात फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)