शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

सिंगल न्यूज

By admin | Updated: August 28, 2015 00:30 IST

कुंभार समाजाची

कुंभार समाजाची
रविवारी बैठक
सोलापूर: सोलापूर जिल्हा कुंभार समाजाची बैठक रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता टाकळीकर मंगल कार्यालयात होणार असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर म्हेत्रे यांनी कळविले आहे. बैठकीत संघटनेची नवीन कार्यकारिणी निवड व अन्य विषयावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीला समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य संघटक अजित टाकळीकर, तुकाराम कुलाल, गुरुलिंग कुंभार यांनी केले आहे.
प्राध्यापक संघटनेची रविवारी वार्षिक सभा
सोलापूर: सोलापूर शहर जिल्हा ज्युनिअर कॉलेज प्राध्यापक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (30 ऑगस्ट) रोजी दुपारी 12.30 वाजता रावजी सखाराम महाविद्यालय, सम्राट चौक येथे आयोजित केली आहे. या सभेत प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे जिल्हाध्यक्ष प्रा. विलास मोरे, जन. सेक्रेटरी प्रा. प्रकाश भोसले यांनी केले आहे.
सुमतीबाई स्कूलमध्ये विद्यार्थी परिवहन समिती
सोलापूर: येथील सुमतीबाई इंग्लिश स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित होण्यासाठी परिवहन समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी वाहतूृक निरीक्षक जयर्शी झिने, पोलीस प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांची शालेय परिसरातील सुरक्षितता यावर मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापिका रत्नर्शी तळे, स्वाती कांबळे, वाहतूक निरीक्षक जयर्शी झिने, परविंदरसिंग साहोटा, प्रभाकर जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
चारा छावणी
टँकर सुरु करा
सोलापूर: जिल्?ात दुष्काळी स्थितीमुळे पाणी आणि चारा टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून चारा छावणी व पाण्याचे टँकर सुरु करावेत, अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. पाणी आणि चारा नसल्यामुळे जनावरे कत्तलखान्याकडे जात आहेत. उजनीतून पाणी सोडून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनावर प्रशांत गिड्डे, रवी शिंदे, उमेश रसाळकर, युवराज चुंबळकर , प्रशांत इंगळे आदी पदाधिकार्‍यांच्या स?ा आहेत.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेस
उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर: हॅपी डेज स्कूलतर्फे चिमुकल्यांसाठी घेतलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिमुकल्यांनी स्वातंत्र्यसेनानी, शेतकरी, पोलीस, सैनिक अशा विविध वेशभूषा सादर केल्या. या उपक्रमासाठी राजेश जाधव, सचिन राठोड, विद्या मणुरे, मुख्याध्यापिका वैशाली साबळे, नरेंद्र दारा, अजय बुरा, पल्लवी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडच्या
शाखेचा शुभारंभ
सोलापूर: वसंतविहार जुना पुणे नाका येथे जिजाऊ ब्रिगेडच्या नवीन शाखेचे उद्घाटन राज्याच्या उपाध्यक्षा नंदाताई शिंदे, जिल्हाध्यक्षा लताताई ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. शाखेच्या अध्यक्षपदी मोहिनी चटके, सचिवपदी मनोरंजना आणि कार्याध्यक्षपदी विनिता भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली.
सुंदर हस्ताक्षर
स्पर्धेचे आयोजन
सोलापूर: आनंदर्शी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. 30 ऑगस्ट) सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, डफरीन चौक येथे हस्ताक्षर सुलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी आहे. याचवेळी विजेत्यांच्या पारितोषिक वितरण समारंभात गुणवंत शिक्षिका पुरस्कार वितरण होईल. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. र्शुतिर्शी वडकबाळकर उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्षा डॉ. माधवी रायते यांनी केले आहे.
समूहगीत स्पर्धेचे आयोजन
सोलापूर: जिल्हा राष्ट्रभाषा प्रचार समिती, नागेश करजगी युथ फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी 29 सप्टेंबर रोजी हिंदी समूहगान स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सकाळी 10 वाजता होणार आहे. विजेत्यांना 2501, 2001, 1501 अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिके व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
‘लोकमंगल’तर्फे
सामूहिक रक्षाबंधन
सोलापूर: लोकमंगल परिवारातर्फे नीलमनगर, विनायक नगर, बोळकोटे नगरासह परिसरात शनिवारी 500 भगिनी सामूहिक रक्षाबंधन उत्सव साजरा करणार आहेत.