सिमी दहशतवाद्यांचे चकमक स्थळ बनले 'सेल्फी पॉईंट'
By Admin | Updated: November 2, 2016 08:57 IST2016-11-02T08:57:36+5:302016-11-02T08:57:36+5:30
भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पळणा-या सिमीच्या आठ दहशतवाद्यांना पोलिसांनी चकमकीत यमसदनी धाडले.

सिमी दहशतवाद्यांचे चकमक स्थळ बनले 'सेल्फी पॉईंट'
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. २ - भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पळणा-या सिमीच्या आठ दहशतवाद्यांना पोलिसांनी चकमकीत यमसदनी धाडले. त्यावरुन देशात सध्या जोरदार राजकारण सुरु असताना प्रत्यक्षात ही चकमक ज्या मानीखेडी पहाडी भागात झाली तो परिसर पर्यटन स्थळ बनला आहे. आसपासच्या गावातले गावकरी उत्सुकतेपोटी मोठया संख्येने रोज इथे येत आहेत.
चकमक झाल्याच्या अनेक खुणा या परिसरात पहायला मिळत असून, पोलिसांनी इथे कुठलाही बंदोबस्त ठेवलेला नाही. अतिरेक्यांचे कपडेही इथे विखरुन पडलेले आहेत. पहायला येणारे अनेकजण रक्ताचे डाग असलेले खडक, गवताजवळ उभे राहून सेल्फी काढत आहे. अनेक गावकरी आपल्या मुलाबाळांसह इथे येत आहेत.
सुरक्षा बंदोबस्त का ठेवण्यात आला नाही या प्रश्नावर अतिरिक्त एसपी धरमवीर सिंह यांनी सर्व आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. शोध मोहिम पूर्ण झाली असून फक्त खडकांवर रक्ताचे डाग राहिले आहेत त्यामुळे सुरक्षा बंदोबस्त ठेवला नसल्याचे उत्तर दिले.
रविवारी मध्यरात्री सुरक्षा रक्षकाची हत्या केल्यानंतर तुरुंग फोडून पळणा-या सिमीच्या आठ दहशतवाद्यांना पोलिसांनी मानीखेडी पहाडी भागात गाठले. तिथे झालेल्या चकमकीत हे दहशतवादी ठार झाले. कारागृहापासून १३ किमी अंतरावर हे ठिकाण आहे.